myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

थायरॉईड ग्रंथी गळ्याच्या भागात असलेला शरीराचा एक लहान भाग आहे आणि शरीराचे होमियोस्टॅसिस अबाधित राखण्यासाठी जबाबदार असतो. यामध्ये थायरॉईड हॉर्मोन्स बनतात. या हॉर्मोन्सच्या पातळीतील कोणत्याही असंतुलनामुळे शरीराच्या विविध संस्थांचे कार्य बिघडू शकते. थायरॉईडचा विकार अतिशय सामान्य समस्या आहे. याने पुरुषांपेक्षा महिला अधिक प्रभावित होतात. हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम या दोन प्रमुख थायरॉईड समस्या आहेत. थायरॉईड हार्मोन्सची आवश्यकतेपेक्षा अधिक निर्मिती म्हणजे हायपरथायरॉईडीझम समस्या तर थायरॉईड हार्मोन्सची आवश्यकतेपेक्षा कमी निर्मिती हायपोथायरायडिझम समस्या असते. थायरॉईडचा कॅन्सर हा थायरॉईड हॉर्मोन्सचा अजून एक गंभीर विकार असून हा जगातील सर्वात सामान्य एंडोक्राइन कॅन्सरचा प्रकार आहे. या समस्यांची मूलभूत कारणे स्पष्टपणे प्रस्थापित आहेत आणि चाचणीद्वारे याचे निदान केले जाऊ शकते. त्वरित उपचार थायरॉईड हार्मोन्सची कार्यप्रणालीत सुधारणा करण्यात मदत करू शकतात. जीवनशैली व्यवस्थापनामध्ये समतोल आहारातील संतुलित आयोडीन आणि तणावापासून मुक्त होण्यासाठी योग आणि ध्यान करणे हे समाविष्ट असते. नियमित तपासणी आणि एंडोक्रायनोलॉजिस्टचा सल्ला थायरॉईड समस्यांना नियंत्रित करण्यात मदत करू शकतात.

थायरॉईडचा विकार म्हणजे काय?

थायरॉईड ग्रंथी एक अंतःस्रावी ग्रंथी असते ज्यामुळे दोन हार्मोन्स, ट्रायआयोडोथायोनिन (टी 3) आणि थायरॉक्सिन (टी 4) तयार होतात. या हार्मोन्सची निर्मिती आणि स्राव अग्रगण्य पिट्यूटरीमध्ये तयार होणाऱ्या थायरॉईड-स्टिम्युलेटिंग हार्मोन (टीएसएच) द्वारे नियंत्रित केले जाते. आणि या थायरॉईड-स्टिम्युलेटिंग चे नियोजन थायरॉईड-रिलिझींग हार्मोन किंवा टीआरएच द्वारे केले जाते. हे हार्मोन आपल्या शरीराच्या मूलभूत चयापचयसाठी जबाबदार असतात. हार्मोन्स जेव्हा थायरॉईड ग्रंथीच्या अयोग्य उत्तेजनामुळे जास्त प्रमाणात किंवा अपुरे  निर्माण होतात तेव्हा थायरॉईडच्या समस्या होतात. अशा समस्यांसाठी कारणे ऑटोम्युन्यून असू शकतात किंवा थायरॉईड ग्रंथीमधील कॅन्सर किंवा कॅन्सरच्या नसलेल्या पण अनियंत्रित वाढीमुळे किंवा ग्रंथीचा दाह झाल्यामुळे असू शकतात. जागतिक स्तरावर, थायरॉईडची समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते; 0.5% पुरुषांच्या तुलनेत जवळजवळ 5% महिला या समस्यांमुळे प्रभावित होतात. प्रत्येक थायरॉईड समस्येमुळे अखेरीस थायरॉईड हार्मोन्स, अति प्रमाणात किंवा कमी प्रमाणात स्रवतात, ज्यामुळे शरीराची जवळजवळ प्रत्येक पेशी प्रभावित होते.

  1. थायरॉईडचा विकार साठी औषधे
  2. थायरॉईडचा विकार चे डॉक्टर
Dr. B.P Yadav

Dr. B.P Yadav

Endocrinology
1 वर्षों का अनुभव

Dr. Vineet Saboo

Dr. Vineet Saboo

Endocrinology
8 वर्षों का अनुभव

Dr. JITENDRA GUPTA

Dr. JITENDRA GUPTA

Endocrinology
1 वर्षों का अनुभव

Dr. Rahat Dent

Dr. Rahat Dent

Endocrinology
4 वर्षों का अनुभव

थायरॉईडचा विकार साठी औषधे

थायरॉईडचा विकार के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
ADEL 31 खरीदें
ADEL 34 खरीदें
ADEL 43 खरीदें
ADEL 79 खरीदें
ADEL 9 खरीदें
SBL B Trim Drops खरीदें
ADEL Kali Carb Dilution खरीदें

References

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Simple goiter.
  2. American Thyroid Association. [Internet]: Virginia, USA ATA: Complementary and Alternative Medicine in Thyroid Disease (CAM).
  3. Michigan Medicine: University of Michigan [internet]; Thyroid Disorders.
  4. Healthdirect Australia. Causes of thyroid problems. Australian government: Department of Health
  5. Healthdirect Australia. Thyroid problems. Australian government: Department of Health
  6. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Thyroid Diseases.
  7. American Thyroid Association. [Internet]: Virginia, USA ATA: Thyroid Surgery.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें