myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

सारांश

आतड्यांमधील जमलेला वायू, ज्याला फ्लॅटस म्हणूनही ओळखले जाते, अशी एक अवस्था असते ज्यात आतड्यांमधे गॅसचा संचय होतो. यामुळे ढेकर येणे, गोळे येणे (पोट पूर्ण भरलेले वाटणे), अपानवायूचे उत्सर्ग आणि अगदी ओटीपोटात पिळवटून आल्यासारखे वाटू शकते. वायू बाहेर निघण्यासाठी वापरलेला शब्द 'फ्लॅट्युलन्स' म्हणून ओळखला जातो. आपण खातो आणि बोलतो तेव्हा वायू सहसा तोंडातून शरीरात प्रवेश करतो. मोठ्या आतड्यात उपस्थित असलेले जिवाणू अन्नाचे विघटन करतात, तेव्हाही वायू तयार होतो. गुदाशय किंवा तोंडातून वायू निघणे सामान्य आहे.कारणे सामान्यतः अपचन पासून अल्सरेटिव्ह कोलायटिस यासारख्या जटिल परिस्थितींमधे असू शकतात. निदान ही वैद्यकीय  लक्षणे यावर आधारित असते. गंभीर प्रकरणात, डॉक्टर आपल्याला अंतर्निहीत कारणांची पुष्टी करण्यासाठी पोटाचा एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, एंडोस्कोपी किंवा रक्त तपासणी करण्यास सांगतात. गंभीर अस्वस्थता किंवा सामाजिक गुंतागुंत ननिर्माण झाल्यास आंतड्याच्या वायूचे उपचार क्वचितच आवश्यक असतात.मूलभूत कारणाचा उपचार केल्यामुळेही स्वस्थता मिळते. आतड्यांवरील वायूच्या उत्पादनाशी संबंधित विशिष्ट पदार्थांपासून दूर राहणे देखील कदाचित मदत करेल. आंतरिक वायूच्या गुंतागुंती क्वचितच ऐकल्या जातात आणि त्वरित उपचार व आहारातील बदलामुळे चांगले परिणाम होतात.

 1. पोटात गॅस ची लक्षणे - Symptoms of Stomach Gas in Marathi
 2. पोटात गॅस ची कारणे - Causes of Stomach Gas in Marathi
 3. पोटात गॅस चा उपचार - Treatment of Stomach Gas in Marathi
 4. पोटात गॅस काय आहे - What is Stomach Gas in Marathi
 5. पोटात गॅस साठी औषधे
 6. पोटात गॅस चे डॉक्टर

पोटात गॅस ची लक्षणे - Symptoms of Stomach Gas in Marathi

अपानवायूच्या वाढीची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

 • ढेकरयेणे
  हे प्रामुख्याने पचननलिकेच्या (पोट आणि लहान आतडे) वरच्या भागामधे हवेच्या(गिळताना किंवा बोलताना) अधीक प्रमाणातील संचयामुळे होते.
 • फ्लॅटूलंस
  मुख्यत्वे मोठ्या आतड्यांमधेवायू किंवा फ्लॅटसचासंचय झाल्यामुळे हे होते. याचे मूख्य कारण,आंबलेले अन्न, वनस्पती तंतू किंवा जटिल कर्बोदकांचे जिवाणूंनी केलेले विघटन आहे. कधीकधी अन्नाच्या अपूर्ण पचनामुळे वायू तयार होऊ शकतो.
 • ग़ोळे येणे
  आंतड्यांत वायूचा पुरेसा संग्रह झालेला नसला तरी,पोट पूर्ण भरल्यासारखे वाटणे. लोक बहुतेक वेळा पोटात अस्वस्थता अनुभवतात आणि तयार झालेल्या वायूला उत्सर्ग किंवा ढेकर देऊन बाहेर काढण्यास सक्षम नसतात. (अधिक वाचा – गोळे न येण्यासाठी घरगुती उपचार)

दिवसातून 25 पेक्षा अधिकवेळा,वारंवार ढेकर येणे किंवा वायू होण्याचे प्रमाण वाढते. रात्रीच्या वेळी ते अधिकच वाढू शकते.

पोटात गॅस ची कारणे - Causes of Stomach Gas in Marathi

कारणे

आतडीत गॅस होण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्ही खात असलेले अन्न आणि आपल्या काही सवयी. काही खाद्य पदार्थांमुळे आतड्यातील गॅसचे अत्यधिक उत्पादन होते. हे आहेत:

 • डाळी
 • चवड्या
 • पातकोबी, फुलकोबी, ब्रॉकॉली किंवा ब्रसेल स्प्राऊट यासारख्या भाज्या
 • दुधाची उत्पादने
 • फ्रुक्टोझसारखी कार्बोदके किंवा सॉर्बिटॉलसारखी कृत्रिम गोडी आणणारे पदार्थ
 • सोडा आणि बिअरसारखे एरेटेड पेय
 • मद्य
 • बटाटे आणि भात यांसारखे स्टार्च असलेले पदार्थ
 • च्युइंग गम आणि मिठाई यांचे अत्यधिक वापर
 • धूम्रपान

काही वेळा खालील आजारांमध्ये अत्यधिक आतडीतील गॅस लक्षण म्हणून दिसते:

 • पॅंक्रियाटीस (स्वयंप्रतिकार प्रकाराची)
  हे स्वादुपिंडाचे दाह असते.]
 • जीईआरडी (गॅस्ट्रोईसीफेगल रिफ्लक्स डिसीझ)
  पचनतंत्रातील रोग, ज्यामुळे पोटातील वस्तू अन्ननलिका किंवा पोटाला तोंडाशी जोडणार्र्या नलिकेत सारखे सारखे परत जातात.
 • मधुमेह
  खूप काळापासून रक्तात अधिक शर्करा असल्याने पोट साफ होण्यात वेळ लागतो( जिला गॅस्ट्रोपॅरेसिस म्हणतात), ज्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते, पोटाचे आकार बिघडते आणि गॅस बनते.
 • अल्सरेटिव्ह कोलायटीस किंवा क्रोन्स डिसीझ:
  ही एक असाध्य दाहजनक व्याधी आहे, ज्यामुळे पचनमार्गाची सूज होते आणि पचन खुंटून आतडीतील वायू अधिक होण्यासह अतिसार, पोटदुखी, ताप आणि वजन कमी होण्यासारखी इतर लक्षणे दिसून येतात.
 • इरिटेबल बॉव्हेल सिंड्रोम
  या अवस्थेमध्ये बद्धकोष्ठता किंवा अतिसार, पोट फुगल्यासारखे वाटणें आणि कोणत्याही ज्ञात किंवा चाचणी न होणार्या कारणाशिवाय आकड्या येणें अशी वैशिष्ट्ये असतात.
 • पेप्टिक अल्सर
  या अवस्थेमध्ये पोट किंवा आतड्यांच्या सुरक्षात्मक किनारीच्या हानीमुळे खुल्या फोडी(क्षता) बनतात.
 • सेलिएक डिसीझ
  एक स्वयंप्रतिकार रोग, ज्यामध्ये ग्लुटेन किंवा गहू असलेले पदार्थ घेतल्याने प्रतिकार प्रणालीची प्रतिक्रिया म्हणून गटच्या भिंतीची हानी सुरू होते.

पोटात गॅस चा उपचार - Treatment of Stomach Gas in Marathi

आतड्यांमधील वायू कमी करण्यासाठी विशिष्ट उपचार नाही; उपचार सहसा लक्षणांवर आधारित असतात आणि आहारांतील सुधारणा ही सर्वात महत्वाची पायरी आहे.

काही घरगुती औषधे उपलब्ध आहेत, जी आतड्यांतील वायूमुळे होणाऱ्या अस्वस्थतेतून मुक्तता मिळवून देऊ शकतात. चारकोल असलेली औषधे फ्लॅट्युलन्स कमी करण्यास मदत करतात.फ्लॅटसच्या निष्कासनाने होणारा सल्फाइडचा गंध बिस्मथ सॅलिसिलेटमूळेकमी होतो. अल्फा-डी-गॅलेक्टोसायडेस हे जटिल कार्बोदकांचे पचन करण्यास मदत करते. आईबीएसच्या रुग्णांना एंटिस्पास्मोडिक्स घेण्याने लाभ होऊ शकतो, ज्यामुळे आतड्यांतील अतिरिक्त वायूमुळे होणाऱ्या पिळवटून निघाल्यासारख्या वेदना कमी होतात. अतिरीक्त जिवाणू/बॅक्टेरीयांची वाढ झाल्यास प्रतिजैविकेसुद्धा दिली जातात..

जीवनशैली व्यवस्थापन

आतड्यांत अधिक वायू निर्माण होणे कमी करण्यासाठी सोपे उपाय केले जाऊ शकतात. आहारातील बदल, उदा.वायू वाढीस लावणारे अन्न पदार्थ टाळणे,हा जीवनशैलीतील सुधारणांचा मुख्य भाग आहे. यामध्ये क्रूसिफेरस भाज्या,सफरचंदासारखी तंतुमय फळे, साखर आणि साखरीचे पर्यायी पदार्थ, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे यांचा समावेश आहे. तणावामुळे पचनसंबंधी तक्रारी देखील होऊ शकतात, ज्यामुळे आतड्यांमधील वायू उत्पादनात वाढ होते. म्हणून, तणावांचे व्यवस्थापन आवश्यक आहे. नियमित व्यायाम शरीराला, विशेषतः पोटाच्या स्नायूंना, सुस्थितीत ठेवतात आणि पाचन पथ सक्रिय ठेवतात.

पोटात गॅस काय आहे - What is Stomach Gas in Marathi

जठरांत्रांच्या मार्गातील जिवाणूंनी केलेल्या अन्नाच्या विघटनप्रक्रियेमुळे  किंवा खाण्याच्या प्रक्रियेतील हवेच्या अजाणतेपणाने केलेल्या सेवनाने मनुष्याच्या शरीरात फ्लॅटस तयार होतो. त्याने पोटातील वात होतो किंवा ढेकर येतात. आंतड्यांत सुमारे 200 ml वायू असतो तर 600-700 ml वायू फ्लॅटसच्या स्वरूपात शरीरातून बाहेर काढला जातो. पोटात वायू होणे एक सामान्य शारीरिक क्रिया आहे. फ्लॅटसची वारंवारता आणि त्याचे प्रमाण वैयक्तिकरित्या स्वतंत्र आहे. हे चारचौघांत असुविधाजनक आणि लाजिरवाणे वाटू शकते. फ्लॅटसमधे हायड्रोजन, मिथेन आणि कार्बन डायऑक्साइडसारख्या वायू असतात. वायूचा गंध हायड्रोजन सल्फाइडसारखा असतो.

Dr.Priyanka Trimukhe

Dr.Priyanka Trimukhe

General Physician
3 वर्षों का अनुभव

Dr. Nisarg Trivedi

Dr. Nisarg Trivedi

General Physician
1 वर्षों का अनुभव

Dr MD SHAMIM REYAZ

Dr MD SHAMIM REYAZ

General Physician
7 वर्षों का अनुभव

Dr. prabhat kumar

Dr. prabhat kumar

General Physician
1 वर्षों का अनुभव

पोटात गॅस साठी औषधे

पोटात गॅस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Rablet खरीदें
R Ppi Tablet खरीदें
Helirab खरीदें
Rabium खरीदें
Rantac खरीदें
Rekool Tablet खरीदें
Rabeloc खरीदें
Zinetac खरीदें
Gelusil Mps खरीदें
Aciloc खरीदें
Rablet D Capsule खरीदें
Razo D खरीदें
Rekool D खरीदें
Razo खरीदें
Veloz D खरीदें
Pantocar L खरीदें
Nexpro L खरीदें
Erb Dsr खरीदें
Reden O खरीदें
Spasmokem खरीदें
Raciper L खरीदें
Zadorab खरीदें
R T Dom खरीदें
Spasmover खरीदें
Raciper Plus खरीदें

References

 1. International Foundation for Gastrointestinal Disorders. [Internet]. IFFGD,U.S. Controlling Intestinal Gas.
 2. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Symptoms & Causes of Gas in the Digestive Tract.
 3. MSDmannual professional version [internet].Gas-Related Complaints. Merck Sharp & Dohme Corp. Merck & Co., Inc., Kenilworth, NJ, USA
 4. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Gas in the Digestive Tract
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Gas
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें