myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन सिंड्रोम (पीसीओएस) काय आहे?

पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन सिंड्रोम, ज्याला पीसीओएस असेही म्हणतात, हा लक्षणांचा संच आहे जो महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन झाल्यामुळे होतो. साधारणपणे हे जनन क्षमतेच्या महिला ज्यांचे वय 18 -35 वर्षे असते त्यांना होतो. याचे नावा याच्या महत्वाच्या लक्षणांपैकी एकखवरुन पडले आहे. प्रभावित महिलेच्या एकातरी अंडाशयात 12 (नेहमीच नाही) किंवा जास्त बीजकोष असतात. त्यासोबत इतर हार्मोन जसे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन (एफएसएच) आणि ल्युटेनायझिंग हार्मोन (एलएच) चे स्तर बिघडलेले असते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहे?

याची लक्षणे खालील प्रमाणे आहे:

 1. अमेनोऱ्हिया म्हणजेच पाळी न येणे.
 2. डिस्मेनोऱ्हिया म्हणजेच पाळी मध्ये त्रास/वेदना होणे.
 3. अनियमित मासिक पाळी.
 4. हिर्सुटिज्म म्हणजेच चेहऱ्यावर आणि शरीरावर जास्तीचे केस उगवणे.
 5. मुरूम / पुरळ.
 6. कंबरेमध्ये वेदना होणे.
 7. गर्भ राहण्यास कठीण जाणे.
 8. लठ्ठपणा, पोटावर चरबी जमा होणे.
 9. पेरिफेरल इन्श्यूलिन रेझिस्टन्स.
 10. वंधत्व.
 11. रुग्णाच्या कुटुंबामध्ये मासिक पाळीच्या विकार,ॲड्रेनल एन्झाइम ची कमतरता,वंधत्व,लठ्ठपणा आणि मेटाबोलिक सिन्ड्रोम, किंवा मधुमेह याचा इतिहास असू शकतो. वैकल्पिकरित्या,त्यांना अतिरिक्त ब्लीडींग किंवा मासिक पाळी उशिरा येणे ह्या तक्रारी होऊ शकतात.

याची मुख्य कारणं काय आहे?

पीसीओएस दोन्ही पालकांकडून अनुवांशिक पूर्वकल दाखवतो आणि वांशिकरित्या प्रभाव दाखवतो.  रुग्णाच्या शरीरामध्ये अँड्रोजन(पुरुष हार्मोन) ची पातळी वाढलेली असते,मुख्यत्वे करून टेस्टोस्टेरॉन ची, पातळी वाढली असते. हे हार्मोन ओव्ह्युलेशन पॅटर्न मध्ये अडथळा आणतात आणि त्यामुळे इतर लक्षणे दिसून येतात.हे हार्मोन फॉलिकल्स ला परिपक्वव होऊ देत नाही. हे अपरिपक्व फॉलिकल्स आहेत जे अंडाशयात द्रव भरलेल्या सिस्ट सारखे दिसतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदानामध्ये संपूर्ण वैद्यकीय अभ्यास आणि शारीरिक तपासणी समाविष्ट आहे. प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये थायरॉईड फंक्शन टेस्ट; एफएसएचची पातळी, प्रोलॅक्टिन, आणि एलएच; टेस्टोस्टेरॉन आणि शरीरातील शुगरची पातळी तपासणे यांचा समावेश होतो. यासोबतच, नॉन-इन्व्हेझिव्ह इमेजिंग जसे अल्ट्रासोनोग्राफी केली जाऊ शकते.अंडाशयातील सिस्ट हे मोत्यांच्या धाग्यात बांधल्यासारखे विशिष्ट पद्धतीत दिसतात.

उपचारामध्ये रुग्णाला निरोगी जीवनशैली आचरणात आणण्यासाठी प्रवृत्त केले जाते. बदलांमध्ये निरोगी आहार, वजन कमी करणे आणि नियमित व्यायाम केल्यास हार्मोनचा समतोल साधण्यास मदत होते. आणखी, डॉक्टर कडून हार्मोन थेरपी सांगितली जाऊ शकते.  मधूमेह होण्यापूर्वी किंवा इन्श्युलिन रेझिस्टन्स मध्ये इन्श्युलिन ला उत्तेजित करणारे औषध जसे मेटफोर्मीन मदत करू शकतात.

 1. पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन सिंड्रोम (पीसीओएस ) साठी औषधे

पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन सिंड्रोम (पीसीओएस ) साठी औषधे

पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन सिंड्रोम (पीसीओएस ) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
i-Pill खरीदें
Duoluton L Tablet खरीदें
Loette Tablet खरीदें
Ovilow Tablet खरीदें
Ovral G Tablet खरीदें
Ovral L Tablet खरीदें
Suvida Tablet खरीदें
Triquilar Tablet खरीदें
Dearloe Tablet खरीदें
Ergest Tablet खरीदें
Ergest Ld Tablet खरीदें
Esro Tablet खरीदें
Esro G Tablet खरीदें
Esro L Tablet खरीदें
Florina Tablet खरीदें
Florina G Tablet खरीदें
Florina N Tablet खरीदें
Mala D Tablet खरीदें
Nogestol Tablet खरीदें
Orgalutin Tablet खरीदें
Levora Tablet खरीदें
Lyna Tablet खरीदें
Oc 21 Tablet खरीदें
Ovral Tablet खरीदें
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें