myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

ओव्हरॲक्टिव्ह ब्‍लॅडर सिंड्रोम काय आहे ?

ओव्हरॲक्टिव्ह ब्‍लॅडर सिंड्रोम अशा स्थितीला संदर्भित करते ज्यात एखाद्या व्यक्तीला लघवीसाठी अचानक आणि अपरिहार्य इच्छेचा अनुभव येतो. आग्रह दिवसाला अचानक कोणत्याही वेळी होऊ शकतो. हा सिंड्रोम सामान्य आहे आणि यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात गैरसोय होते आणि सामाजात लाजिरवाणे वाटू शकते.

त्याच्याशी संबंधित मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?

ओव्हरॲक्टिव्ह ब्‍लॅडर सिंड्रोम मध्ये पुढील लक्षणे दिसून येतात:

  • मूत्र विसर्जन तात्काळ करण्याची आवश्यकता: ही तात्काळ आवश्यकता अपरिहार्य असू शकते आणि त्याला अडवणे कठीण होऊ शकते. यामुळे लघवीची अनैच्छिक गळती होऊ शकते ज्याला तात्काळ मूत्रपिंड असंतुलन (अर्जन्सी युरिनरी इंकॉंटीनन्स) म्हणून देखील ओळखले जाते.
  • लघवीला जाण्याची वारंवारता वाढतेः ओव्हरॲक्टिव्ह ब्‍लॅडर सिंड्रोम मध्ये नेहमी पेक्षा लघवीला जाण्याची वारंवारता वाढते. (अधिक वाचा:वारंवार लघवीचे कारण आणि प्रतिबंध)
  • विस्कळीत झोप: लघवीला जाण्याच्या उत्कट इच्छेमुळे, व्यक्तीस रात्री सुद्धा बरेचदा जागे होणे भाग पडते यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो.
  • व्यक्तीस तणाव किंवा चिंता होत असल्यास ओव्हरॲक्टिव्ह ब्‍लॅडर सिंड्रोम ची लक्षणे खराब होऊ शकतात.

याची मुख्य कारणं काय आहेत ?

ओव्हरॲक्टिव्ह ब्‍लॅडर सिंड्रोम चे अंतर्निहित कारण हे मूत्राशयाच्या स्नायूंचे जास्त प्रमाणात आकुंचन पावणे हे आहे. हे मूत्र बाहेर टाकण्याची इच्छा उत्पन्न करते. पण, या स्नायूंचे असामान्यपणे आकुंचन पावणे कशामुळे होते हे स्पष्टपणे माहित नाही आहे.

हे लक्षात आले आहे की हा सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये मूत्राशय मेंदूला सूचित करतो की तो पूर्ण भरला आहे पण प्रत्यक्षात तसे नसते.

काही प्रकरणात, ओव्हरॲक्टिव्ह ब्‍लॅडर सिंड्रोम हे मेंदू-संबंधित रोगांचे परिणाम होऊ शकते जसे की:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

ओव्हरॲक्टिव्ह ब्‍लॅडर सिंड्रोम निदान करण्यासाठी, डॉक्टर सामान्यत: लक्षणांबद्दल विचारतात आणि नंतर शारीरिक तपासणी किंवा मूत्र चाचणी करुन संसर्गाची चिन्हे शोधतात. मूत्र प्रवाहाच्या ताकदीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि ती व्यक्ती मूत्राशयातून मूत्र पूर्णपणे रिकामे करत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी फ्लो टेस्ट देखील करता येते.

या सिंड्रोमच्या उपचारांमध्ये मूत्राशय प्रशिक्षण समाविष्ट आहे ज्यामुळे मूत्राशयाच्या हालचालींवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते आणि लघवीची उत्कट इच्छा येण्यास विलंब होतो. औषधे देखील दिली जाऊ शकतात पण जीवनशैलीतील बदल जसे पेल्व्हिक व्यायाम करणे, कॅफीन आणि मद्यपान टाळणे आणि वजन कमी करणे ही लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.

काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

  1. ओव्हरॲक्टिव्ह ब्‍लॅडर सिंड्रोम साठी औषधे

ओव्हरॲक्टिव्ह ब्‍लॅडर सिंड्रोम साठी औषधे

ओव्हरॲक्टिव्ह ब्‍लॅडर सिंड्रोम के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Flotros (Raptakos) खरीदें
Trofame खरीदें
Trozyd खरीदें
Flotros(Ipca) खरीदें
Rospium खरीदें
Tropez Od खरीदें
Flavate खरीदें
Flavocip खरीदें
Flavospas खरीदें
Urifree खरीदें
Urikind खरीदें
Urinet खरीदें
Urisol खरीदें
Urispas Tablet खरीदें
Uticept खरीदें
Voxate खरीदें
Bladospas खरीदें
Flavoguard खरीदें
Flavomed खरीदें
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें