myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

सारांश

मानदुखी ही एक आरोग्याशी निगडीत सामान्य समस्या आहे आणि प्रत्येक तीनपैकी एक व्यक्ती मानदुखीची तक्रार करत असते.साधारण मानेच्या स्नायूंमधील ताणासारखी ते कणाच्या तंतूंतील संप्रेषणा सारख्या गंभीर स्वरुपाची करणे यामागे असू शकतात.मणक्याचे आजार (कणाची हाडे) जसे संधिवात, मानेचा स्पॉन्डिलायटीस आणि अशा इतर अवस्थांमुळे मानदुखी होऊ शकते आणि त्वरित वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते.महिला, विशेषत: ज्यांना एकापेक्षा जास्त मुले आहेत आणि अस्वस्थ लोकांना मानेच्या दुखण्याचा त्रास लवकर होऊ शकतो.धक्का किंवा झटक्यामुळे (जो सामान्यत: अपघाताच्या वेळी बसतो) होणारा मानेचा त्रास अनेक वर्षेपर्यंत टिकून राहतो.मानदुखीवरील उपचारांचे खूप प्रकार आहेत आणि वेदनेच्या मूळ कारणांवर ते अवलंबून असतात.बऱ्याच वेळा मानदुखी एका आठवड्यात बरी होते. ती क्वचितच वर्षोनुवर्षे राहते. व्यायाम, औषधोपचार आणि शारीरिक ढब सुधारणे ही मानदुखीच्या नियोजनासाठी असलेल्या मुख्य उपचार योजना आहेत. सामान्यतः शस्त्रक्रिया करणे हा प्रथम उपचाराचा पर्याय नाही आणि सर्व पर्याय संपेपर्यंत ते टाळले जाते.गंभीर मानदुखीसाठी, बहुपयोगी दृष्टीकोनातून व्यायाम, स्नायूंची शक्ती वृद्धिंगत करण्याचे प्रशिक्षण, औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल यांचा समावेश होतो.

 1. मान दुखी ची कारणे - Causes of Neck Pain in Marathi
 2. मान दुखी चा उपचार - Treatment of Neck Pain in Marathi
 3. मान दुखी साठी औषधे
 4. मान दुखी चे डॉक्टर

मान दुखी ची कारणे - Causes of Neck Pain in Marathi

मानदुखीचा त्रास अनेक कारणांमुळे होऊ शकतो आणि त्यापैकी काहींचा खाली उल्लेख केला आहे:

 • अशक्त व अतीवापरलेले स्नायू
  मानेचे स्नायूंना ताणून बराच काळ बसल्याने मान आणि खांद्याना वेदना होतात आणि ताठरपणा येतो. स्नायू कमकुवत असतांना शारीरिक हालचाली व श्रम केल्याने, जसे सायकल चालविणे किंवा पोहणे,स्नायूंचा अतिवापर होतो व मानेच्या स्नायूंमधे वेदना होऊ शकतात.
 • मानेच्या तंतूंची झीज
  वयासोबत होणारी मानेच्या तंतूंची झीज,मानेचा स्पॉन्डिलायसिस, मानदुखीसाठी कारणीभूत होऊ शकते. मानेचा स्पॉन्डीलायसिस ती स्थिती आहे ज्यात हाडांमधीलफटी आकूंचन पावतात आणि हाडांच्या काठावर हाडांसारखीच असामान्य वाढ होते.
 • मेरूदंडातील कूर्चा बदलते
  मेरूदंडाची झीज होऊन त्यांतील कुर्चांची लवचिकता कमी होते. कधीकधी, मेरूदंडातील कुर्चा फुगल्याने कुर्चा घसरण्याचे प्रकार होऊ शकतात.
 • संकीर्ण मणक्याची नळी
  मणक्याच्या संकीर्ण झालेल्या नळीमुळे मज्जातंतू संकुचित होतात आणि मानदुखी होऊ शकते जी खांद्याकडे किंवा हातांकडे उत्सर्जित होऊ शकते.
 • शारीरिक जखम किंवा दुखापत
  अपघातात अचानक लागलेल्या झटक्यामुळे मान गंभीरपणे जखमी होऊ शकते. ही व्हिपलॅश ( चाबकाच्या फटक्याने होते तशी ) इजा म्हणून ओळखली जाते.
 • चुकीची शरिरीक ढब
  चुकीच्या स्थितीत बसण्याने, जसे की बराच वेळ खुर्चीत बसून राहण्याने, मानेवर भरपूर ताण येऊ शकतो आणि मानदुखी होऊ शकते. तसेच, कधीकधी झोपेत अनेक तासांसाठी मान वाकलेल्या स्थितीत राहते. यामुळे मानेत तीव्र वेदना आणि ताठरपणा येऊ शकतो, ज्यामुळे डोके हलविण्यात अडचण होते.

मान दुखी चा उपचार - Treatment of Neck Pain in Marathi

मानदुखीच्या बहुतेक प्रकरणांमधे औषधोपचार व जीवनशैलीतील सुधारणा यांचा संयुक्त वापर करून प्रभावीपणे उपचार केले जातात.आपल्या डॉक्टरांनी सुचविलेल्या काही उपचार पर्यायांमध्ये वेदनाशामक, आणि सूजरोधक औषधे, स्नायू शिथिल करणारी औषधे, मेरूदंडातील लसीकरण, शारीरिक व्यायामाचे उपचार, हालचाली मर्यादित करण्यासाठी कब्ज्यांचा वापर आणि क्रायरोपॅक्टिस सेवा यांचा समावेश असू शकतो.

 • सशक्तीकरणाचे प्रशिक्षण
  गंभीर मानदुखी इतर उपचारांना प्रतिसाद देत नसल्यास स्नायूंच्या सशक्तीकरण प्रशिक्षणाद्वारे त्यांची बळकटी वाढवून मानदुखीचे निराकरण केले जाऊ शकते, याचे हल्ली भरपूर पुरावे उपलब्ध होऊ लागले आहेत. हे व्यायाम मानेच्या कठोर स्नायूंना मोकळे करतात आणि त्यांना शिथिल होण्यास मदत करतात.एका अभ्यासात असे आढळून आले की, व्यायाम करताना मानेच्या स्नायूंमध्ये बळकटी आणण्यासाठी तयार केलेले विशिष्ट व्यायाम नियमितपणे केल्यासारख्या वेदनेतून दीर्घकालीन आराम मिळतो.जर आपल्याला बऱ्याच महिन्यांपसून तीव्र मानदुखी असेल तर वेदनांचे नियोजन करण्यासाठी मदत म्हणून आपल्या डॉक्टरांसोबत सशक्तीकरण प्रशिक्षणाविषयी बोला.आपण कोणत्याही व्यायाम उपक्रमास प्रारंभ करण्यापूर्वी डॉक्टरांच्या मान्यतेची आवश्यकता आहे,विशेषकरून जर आपल्याला आधीच वेदना होत असतील तर, हे लक्षात ठेवा.तुमच्या व्यायाम करण्याने परिस्थिती चिघळत असल्यास डॉक्टर आपणास व्यायाम थांबवण्याचा सल्ला देतील.
 • फिजिओथेरपी
  जर आपल्याला सतत मानदुखीहोत असेल तर आपले डॉक्टर आपल्याला फिजिओथेरेपिस्टकडे पाठवू शकतात. फिजिओथेरेपिस्ट आपल्याला विविध व्यायामांची माहिती देतील आणि आपल्या वेदना समजून घेण्यास आणि त्यांचा सामना कराण्यास मदत करेल. फिजिओथेरपी केल्यावर लोकांना त्यांची दैनंदिन कामे सुरू करण्यास मदत होते.
 • शस्त्रक्रिया
  डॉक्टर क्वचितच शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात आणि इतर सर्व पर्याय संपल्यानंतर हा सामान्यतः शेवटचा पर्याय असतो. कणाच्या मानेच्या भागातील अस्थिरता किंवा मज्जातंतू प्रणालीतील विकारांसारख़्या गंभीर प्रकरणांमध्ये हे आवश्यक आहे.
 • कायरोप्रॅक्टीस उपचार
  कायरोप्रॅक्टीसउपचारांचा एक वैकल्पिक प्रकार आहे ज्यात ठराविक जागेवर नियंत्रित दाबाचा प्रयोग करून मानेच्या वेदनांवर उपचार केले जातात.

स्वतःची अशी काळजी घ्या

 • जर तुम्ही तुमची मान हलवू शकत नसाल तर तुम्ही चार चाकी किंवा दुचाके गाडी चालवणे टाळले पाहिजे, कारण यामुळे तुमची स्थिती आणखी वाइट होऊ शकते.
 • डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय मानेचा पट्टा लाऊ नका व मान हलती ठेवा.
 • वेदना कमी करण्यासाठी मानेवर ठेवायला थंड किंवा उष्ण गादी वापरा.
 • पॅरासिटॅमॉल किंवा आयब्रूफेन सारखी वेदनाशामक औषधं वेदना कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.लक्षात ठेवा, स्वत: आपल्या मनाने औषधघेणे धोकादायक असू शकते आणित्यामुळे आपलं दुखणं आणखी वाढू शकते. एक आठवड्याच्या आत तुमच्या वेदना कमी होत नसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जीवनशैली व्यवस्थापन

निरोगी जीवनशैली दीर्घकालीन मानदुखीची वाढ टाळण्यास मदत करते. एका अभ्यासानुसार, काही सवयी उदा. शारिरीक सक्रियता, मद्यपान टाळणे किंवा नियंत्रित करणे, धूम्रपान टाळणे आणि निरोगी आहार हे संरक्षक भूमिका बजावतात आणि मानदुखीचा त्रास टाळतात. निरोगी जीवनशैली मानदुखी फक्त कमीच करत नाही तर त्याचे व्यवस्थापन करण्यात देखील मदत करू शकते. जर तुमच्या मानेत अतीव वेदना असतील आणि कोणत्याही उपचारांचा लाभ होत नसेल, तर जीवनशैली व्यवस्थापन तुमच्या मानदुखीचा त्रास टाळण्यासाठी महत्वाची भूमिका निभावू शकते.

गंभीर मानदुखी ही तणाव, चिंताग्रस्तता, मनाच्या निराशेकडचा कल, आणि  मानसिक अनारोग्यांशी जुळलेली आहे. जर तुम्हाला वारंवार नैराश्य किंवा चिंताग्रस्तता येत असेल तर, त्यांचे नियोजन केल्याने गंभीर मानदुखी कमी होऊ शकते. शारीरिकरीत्या सक्रिय रहा आणि खुल्या वातावरणात अधिक वेळ घालवा. तणावांना आणखी चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी छंद जोपासा व विकसित करा.

Dr. Kamal Agarwal

Dr. Kamal Agarwal

Orthopedics
8 वर्षों का अनुभव

Dr. Rajat Banchhor

Dr. Rajat Banchhor

Orthopedics
2 वर्षों का अनुभव

Dr. Arun S K

Dr. Arun S K

Orthopedics
6 वर्षों का अनुभव

Dr. Sudipta Saha

Dr. Sudipta Saha

Orthopedics
3 वर्षों का अनुभव

मान दुखी साठी औषधे

मान दुखी के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Meftagesic खरीदें
Nucoxia खरीदें
Brufen खरीदें
Nise खरीदें
Meftal Forte खरीदें
Combiflam खरीदें
Meftal खरीदें
Ibugesic Plus खरीदें
Meftal Spas खरीदें
Etorica खरीदें
Etoridas खरीदें
Nimtop खरीदें
Etoridoc खरीदें
Nimtus खरीदें
Etorvel खरीदें
Nimucon खरीदें
Etos खरीदें
Tizapam खरीदें
Nimuda खरीदें
Etosaid खरीदें
Agretax Mf खरीदें
Nimuflam खरीदें
Etx खरीदें
Biostat Mf खरीदें
Lumbril खरीदें

References

 1. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. The 7 faces of neck pain. Harvard University, Cambridge, Massachusetts.
 2. InformedHealth.org [Internet]. Cologne, Germany: Institute for Quality and Efficiency in Health Care (IQWiG); 2006-. Neck pain: Overview. . 2010 Aug 24 [Updated 2019 Feb 14].
 3. National Health Service [internet]. UK; Neck pain
 4. Peter R. Crofta, Martyn Lewisa , Ann C. Papageorgioub , Elaine Thomasa , Malcolm I.V. Jayson c , Gary J. Macfarlaned , Alan J. Silmanb. Risk factors for neck pain: a longitudinal study in the general population. International Association for the Study of Pain. Published by Elsevier Science B.V [Internet].
 5. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Strength training relieves chronic neck pain; Published: April, 2008. Harvard University, Cambridge, Massachusetts.
 6. Eva Skillgate, Oscar Javier Pico-Espinosa, Johan Hallqvist,Tony Bohman, Lena W Holm. Healthy lifestyle behavior and risk of long duration troublesome neck pain or low back pain among men and women: results from the Stockholm Public Health Cohort. Clin Epidemiol. 2017; 9: 491–500. PMID: 29066933
 7. Anita R. Gross, Faith Kaplan, Stacey Huang, Mahweesh Khan, P. Lina Santaguida, Lisa C. Carlesso, Joy C. MacDermid, David M. Walton, Justin Kenardy, Anne Söderlund, Arianne Verhagen, Jan Hartvigsen. Psychological Care, Patient Education, Orthotics, Ergonomics and Prevention Strategies for Neck Pain: An Systematic Overview Update as Part of the ICON§ Project. Open Orthop J. 2013; 7: 530–561. PMID: 24133554
 8. Allan I Binder. Neck pain. BMJ Clin Evid. 2008; 2008: 1103. PMID: 19445809
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें