myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

घशाची खवखव म्हणजे काय?

घशाची खवखव हे अ‍ॅलर्जी किंवा घशाच्या संसर्गाचे सामान्य लक्षण आहे. यामुळे रुग्णास वेदना आणि अस्वस्थपणा जाणवतो परंतु घरी काळजी घेतल्याने तसेच औषधांनी हे बरे करता येते.

याच्याशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

बरेचदा घशाची खवखवीबरोबर इतरही लक्षणे दिसून येतात जसे की:

 • रुग्णास सतत खोकला येतो आणि त्याचबरोबर सर्दी आणि शिंका येतात.
 • सायनसेसमध्ये अडथळे आल्यामुळे चेहरा आणि डोके जड होते.
 • डोळ्यांना खाज सुटते आणि हाता पायाच्या त्वचेलाही खाज सुटते.
 • अंतर्गत संसर्गाची शक्यता असल्यामुळे घशाची खवखव होणार्‍या रुग्णास तापही येतो.
 • घशाची खवखव अ‍ॅलर्जीमुळे होत असेल तर रुग्णास पोटदुखी, मळमळ आणि चक्करही येऊ शकतात.
 • रुग्णाच्या त्वचेवर चट्टे किंवा इरप्शन्स येऊ शकतात.

याची प्रमुख कारणे काय आहेत?

 • अ‍ॅलर्जीक र्हायनायटीस हे घशाच्या खवखवीचे प्रमुख कारण आहे. ह्याला हे फिव्हरही म्हणतात जो शरीराच्या अतिकार्यशील प्रतिकारक शक्तीमुळे होतो.
 • घशाची खवखव आणि वाहणारे नाक या अ‍ॅलर्जीचा अजून एक प्रकार म्हणजे विशिष्ट पदार्थांची, धुळीची, सुगंधांची अ‍ॅलर्जी. प्रदूषणाचाही या प्रकारात प्रमुख सहभाग असतो.
 • सूक्ष्मजीवांमुळे होणारा संसर्ग हेही घशाच्या खवखवीचे कारण असते. सामान्यत: स्ट्रेप्टोकॉकस (जीवाणू) मुळे हा संसर्ग होतो.
 • गंभीर प्रमाणात झालेले निर्जलीकरण आणि आम्लपित्त यामुळेही घशाची खवखव होऊ शकते.
 • धूम्रपान आणि मद्यप्राशन हेही घशाच्या खवखवीचे कारण बनते किंवा त्याचा त्रास वाढवते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

घशाच्या खवखवीसाठी जर तुम्ही तुमच्या डॉक्टरना भेट दिलीत तर ते सर्वात आधी तुमची शारीरिक तपासणी करतील आणि मग तुमच्या लक्षणांचे कारण जाऊन घेण्याच्या दृष्टीने काही चाचण्याही करतील.

 • घशाची तपासणी केल्यावर त्याचा लालसरपणा किंवा सूज आली आहे का हे कळून येते.
 • संसर्ग आणि अ‍ॅलर्जी आहे का हे तपासण्यासाठी रक्ताची चाचणी करण्याची गरज असते.
 • एखादा अंतर्गत श्वसनसंस्थेचा किंवा पोटाचा विकार असेल तर एक्स-किरण आणि सिटी स्कॅन करण्यास सुचवले जाते.
 • जर घशाची खवखव ही अ‍ॅलर्जी किंवा अ‍ॅलर्जीक र्हायनायटीसमुळे असेल तर हायपरसेंसिटीव्ह रिअ‍ॅक्शन कमी करण्यासाठी अ‍ॅन्टी-हिस्टामाइन्स सुचवले जातात.
 • कोणत्याही सूक्ष्मजीवांमुळे होणार्‍या संसर्गामुळे घशाची खवखव होत असेल तर त्यावर  अ‍ॅन्टीबायोटिक्स उपचार चांगला प्रतिसाद देतात.
 • आम्लपित्त घशाशी आल्यामुळे जर घशाची खवखव होत असेल तर अ‍ॅन्टासीड्स आणि आहार नियमन सुचवले जाते.
 • टॉन्सिल्सच्या संसर्गामुळे जर सतत घशाला खाज येत असेल तर टॉन्सिलेक्टोमीची गरज भासू शकते.
 1. घशाची खवखव साठी औषधे
 2. घशाची खवखव चे डॉक्टर
Dr. Yogesh Parmar

Dr. Yogesh Parmar

ENT
5 वर्षों का अनुभव

Dr. Vijay Pawar

Dr. Vijay Pawar

ENT
2 वर्षों का अनुभव

Dr. Ankita Singh

Dr. Ankita Singh

ENT
2 वर्षों का अनुभव

Dr. Nikesh Gosrani

Dr. Nikesh Gosrani

ENT
5 वर्षों का अनुभव

घशाची खवखव साठी औषधे

घशाची खवखव के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Cetil खरीदें
Pulmocef खरीदें
Altacef खरीदें
Ceftum Tablet खरीदें
Stafcure Lz खरीदें
Zocef खरीदें
Cat Xp खरीदें
Cefactin खरीदें
Cefadur Ca खरीदें
Cef (Alkem) खरीदें
Cefasom खरीदें
Cefasyn खरीदें
Cefenta खरीदें
Cefnext खरीदें
Ceforim खरीदें
Cefotil खरीदें
Cefoxim La खरीदें
Cefrotux खरीदें
Cefsafe खरीदें
Ceftalin O खरीदें
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें