myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

आयोडिनची कमतरता म्हणजे काय?

आयोडिन हा आहारातील अत्यल्प प्रमाणात लागणारा अत्यावश्यक घटक आहें. थायरॉक्सीन (टी4 आयोडिनच्या चार मॉलेक्युल्स सहित) आणि ट्रायआयोडोथायरोनाईन (टी3 तीन आयोडिन मॉलेक्युल्स सहित) या थायरॉईड हॉर्मोंसचा तो एक घटक आहे. मानवी शरीरात आयोडिन तयार होत नाही त्यामुळे आहार हाच आयोडिनचा स्त्रोत असतो. आयोडिनच्या कमतरतेमुळे थायरॉईड हॉर्मोंसचे कमी उत्पादन होते ज्यामुळे हायपोथायरॉइडीझम, ग्वॉईटर (थायरॉइड ग्रंथीचा आकार वाढणे) तसेच क्रेटीनिझम आणि गरोदरपणात देखील समस्या उद्भवतात. गरोदर तसेच नर्सिंग स्त्रियांना सामान्य प्रौढ व्यक्तीपेक्षा 50% जास्त आयोडिनची गरज असते जे न मिळाल्यास शरिरात आयोडिनची कमतरता होण्याचा धोका असतो.

याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

आयोडिनची कमतरता असलेल्या रुग्णामध्ये पुढील लक्षणे दिसून येतात ज्यांचा संबंध एखाद्या विशिष्ट वैद्यकिय समस्येशी असू शकतो

 • हाताच्या बोटांची नखे वारंवार तुटणे, केस रुक्ष होणे आणि गळणे.
 • डोळे सुजणे, त्वचा निस्तेज आणि कोरडी होणे.
 • रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, स्नायू आणि सांधेदुखी, कडकपणा, बोलण्याचा वेग कमी होणे तसेच ऐकायला कमी येणे.
 • थायरॉईड, ब्रेस्ट, प्रोस्टेट आणि इतर प्रजननसंस्थेशी संबंधीत समस्या.
 • स्मृतीभ्रंश.
 • ग्वॉईटर - थायरॉईड ग्रंथीच्या आकारात वाढ झाल्यामुळे गळ्याला सूज येणे, श्वासोच्छ्वासात त्रास होणे, गिळताना त्रास होणे तसेच गुदमरल्यासारखे वाटणे.
 • हायपोथायरॉइडिझम - वजन वाढणे, थकवा, त्वचा कोरडी होणे, नैराश्य.
 • गरोदरपणाशी संबंधित समस्या - गर्भपात, बालकाचा जन्माआधीच मृत्यु होणे, वेळेआधी प्रसूती, बाळात जन्मतः विकृती असणे.

याची प्रमुख कारणं काय आहेत?

टेबल सॉल्ट हा आयोडीनचा आहारातील महत्वाचा स्त्रोत आहे. आहारात मीठ कमी असणे किंवा मिठात आयोडीन कमी असल्यामुळे आयोडिनची कमतरता निर्माण होते. मीठातील आयोडीन अन्न शिजवताना नष्ट होते. मांसाच्या तुलनेत फळे आणि भाज्यांमध्ये आयोडीन कमी किंवा जवळ जवळ नसतेच; त्यामुळे शाकाहारी व्यक्तीला आयोडीन कमतरतेचा धोका जास्त असतो. व्यायाम करताना मोठ्या प्रमाणात आयोडीन नष्ट होते त्यामुळेही आयोडीनची कमतरता निर्माण होते.

याचे निदान आणि उपचार कसे करतात?

आयोडिनच्या कमतरतेचे निदान पुढील तपासण्या करून केले जाऊ शकते:

 • लघवीतील आयोडीन - आयोडीनचे प्रमाण लघवीतून तपासले जाऊ शकते. सौम्य आयोडीन कमतरतेमध्ये आयोडीनचे प्रमाण 50-99 mcg/L, मध्यम प्रकारच्या कमतरतेमध्ये 20 ते 49 mcg/L आणि तीव्र प्रकारच्या कमतरतेमध्ये < 20 mcg/L इतके असते.
 • थायरॉईडचा आकार - अल्ट्रासोनोग्राफी ही थायरॉईडचा आकार तपासण्यासाठी योग्य पद्धत आहे.
 • अर्भकान्मध्ये निओनेटल सिरम थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोंस (TSH).
 • सिरम थायरोग्लोब्युलीन.
 • रेडिओआयोडिन - आयोडिनच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथी रेडिओआयोडिन जास्त प्रमाणात घेतात.

आयोडिनच्या कमतरतेवरील उपचार पुढीलप्रमाणे आहेत:

 • मीठाचे आयोडायझेशन - आहारात आयोडिनयुक्त मीठाचा वापर करणे हा आयोडिन कमतरतेवरील चांगला उपचार आहे.
 • इतर पर्याय - तेलाचे आयोडायझेशन (लिपीओडॉल), आयोडिनयुक्त पाणी प्यायला वापरणे तसेच आयोडिनच्या गोळ्या किंवा थेंब वापरणे.
 • आयोडिनयुक्त अन्नाचा आहारात जास्तीत जास्त वापर करणे जसे की सीवीड्स, साधे दही, भाजलेला कॉड, दूध, मासे, पांढरा ब्रेड, शिंपले आणि सालासकट पांढरा बटाटा.
 • थायरॉईड ग्रंथींद्वारे आयोडिनचे शोषण कमी करणाऱ्या पदार्थांचा आहारात वापर टाळा जसे की सोया, कोबी, ब्रोकोली आणि फुलकोबी.

आयोडिनची पातळी वाढवण्यासाठी टीप्स:

 • शरिरातील विषारी द्रव काढून टाका.
 • आयोडिनयुक्त पदार्थ खा.
 • सकस आहाराला प्राधान्य द्या.
 1. आयोडीनची कमतरता साठी औषधे
 2. आयोडीनची कमतरता चे डॉक्टर
Dr. B.P Yadav

Dr. B.P Yadav

Endocrinology
1 वर्षों का अनुभव

Dr. Vineet Saboo

Dr. Vineet Saboo

Endocrinology
8 वर्षों का अनुभव

Dr. JITENDRA GUPTA

Dr. JITENDRA GUPTA

Endocrinology
1 वर्षों का अनुभव

Dr. Rahat Dent

Dr. Rahat Dent

Endocrinology
4 वर्षों का अनुभव

आयोडीनची कमतरता साठी औषधे

आयोडीनची कमतरता के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Iodine खरीदें
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें