myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन (गर्भाशयाची वाढ मंदावणे) म्हणजे काय?

काहीवेळा गरोदरपणात गर्भाची / बाळाची वाढ हवी तशी होत नाही. वाढीच्या या मंदावण्याला इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन (आययूजीआर) असे म्हटले जाते. ह्याचे दोन प्रकार असतात: जेंव्हा गर्भाचा आकार प्रमाणापेक्षा कमी असतो तेंव्हा त्याला सिमेट्रिकल आययूजीआर असे म्हटले जाते आणि जेंव्हा गर्भाचे डोके आणि मेंदू सामान्य आकाराचा असतो तेंव्हा त्याला असिमेट्रिकल आययूजीआर असे म्हटले जाते.

याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

अल्ट्रासाऊंडमध्ये गर्भाच्या एका किंवा सर्व भागांची वाढ उशीराने होताना दिसत असेल तर ते आययूजीआर निर्देश करतात.

याची प्रमुख कारणं काय आहेत?

आययूजीआर ला करणीभूत असणारे घटक एकतर फिटोप्लासेंटल किंवा मॅटर्नल असतात. काही सर्वसामान्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

 • मॅटर्नल वैद्यकीय परिस्थिति ज्यात पुढील बाबींचा समावेश होतो:

 1. मधुमेह मेलिटस.
 2. दीर्घकालीन उच्च रक्तदाब.
 3. गंभीर हायपोक्सिक लंग डिझीज.
 4. अर्ली जेस्टेशनल प्रिक्लेम्पसिया.
 5. इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज.
 6. दीर्घकालीन रिनल डिझीज.
 7. सिस्टमिक लूपस एरिथेमॅटोसस.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर संपूर्ण वैद्यकीय पूर्वेतिहास तपासून तसेच पूर्ण शारीरिक तपासणी करून व पुढे दिलेल्या वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट्स तपासून निदान करतात.

 • संपूर्ण ब्लड काऊंट (सीबीसी) आणि ब्लड केमिस्ट्री पॅनल.
 • संसर्ग आहे का ते तपासणे: टॉर्च साठी मॅटर्नल अ‍ॅन्टीबॉडी टायटर्स (IgM, IgG) ज्यात टोक्झोप्लाझ्मा गोंडी, रुबेला, सायटोमेगॅलो विषाणू आणि HSV-1 आणि HSV-2 टायटर्सचा समावेश असतो.
 • अ‍ॅम्निओसेंटेसिस (इंडक्शनच्या आधी या पद्धतींनी गर्भाची वाढ तपासली जाते).
 • युटेराईन फंडल हाईट मोजली जाते (प्यूबिक बोनच्या वरच्या टोकापासून ते गर्भाशयाच्या वरच्या टोकापर्यंतचे मातेचे पोट).
 • अल्ट्रासाऊंड तपासणी.
 • बायोफिजिकल प्रोफाइल.
 • डॉपलर व्हेलॉसिमेटरी.

आययूजीआर चे उपचार पुढीलप्रमाणे केले जाऊ शकतात:

 • जन्मपूर्व काळातील काळजी:
  • ऑक्सिजनचा पुरवठा थोड्या कालावधीसाठी गरोदरपणा वाढवतो.
  • गर्भाला रक्त पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी संपूर्ण विश्रांति सुचवली जाते.
  • मॅटर्नल आजारांचे व्यवस्थापन आणि आरोग्यपूर्ण आहार.
  • गर्भाच्या फुफ्फुसांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी स्टेरोइड्सची मदत घेतली जाते.
  • आययूजीआर चा धोका असलेल्या मातांना अ‍ॅस्प्रिनचा सौम्य डोज देणे फायद्याचे ठरते.
 • प्रसूती आणि प्रसववेदनांची काळजी:
  • प्रसववेदनांच्या काळात गर्भाच्या हृदयाचे ठोके सतत तपासात राहणे.
  • अ‍ॅम्निऑन फ्यूजनचा ही सल्ला दिला जातो.
  • सिजरियन सेक्शनचा सल्ला दिला जातो.
  • इंट्रायूटेराइन हायपोक्सीया आणि हायपोथर्मिया यामुळे होणार्‍या. हायपोग्लायसेमिआ आणि पॉलीसायथेमियासाठी जन्मलेल्या अर्भकावर पूर्ण लक्ष ठेवले जाते.
  • काही समस्या उद्भवल्यास प्रसूतीसाठी प्रसववेदना वेळेआधी उत्पन्न करवल्या जाऊ शकतात. 

 

 1. इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन(गर्भाशयाची वाढ मंदावणे) साठी औषधे

इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन(गर्भाशयाची वाढ मंदावणे) साठी औषधे

इंट्रायुटेराइन ग्रोथ रिटार्डेशन(गर्भाशयाची वाढ मंदावणे) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Astanol खरीदें
Dubnil (Alchemist) खरीदें
Gestin खरीदें
Gravion खरीदें
Lutanin खरीदें
Nidagest खरीदें
Nidanol खरीदें
Pregular खरीदें
Profar खरीदें
Prolin A खरीदें
Fetugard खरीदें
Gyanaetone खरीदें
Solzar खरीदें
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें