myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

रक्तामध्ये​ फॉस्फेटचे स्तर वाढणे म्हणजे काय?

फॉसफरस हा शरीरातील हाडे व दातांसाठी आवश्यक असलेला सूक्ष्म पोषक घटक आहे. याचे रक्तातील वाढलेले प्रमाणं हे धोकादायक असू शकते आणि त्यावर त्वरित उपचारांची गरज असते. रक्तातील वाढलेल्या फॉस्फेट च्या प्रमाणास हायपरफॉस्फेटेमिया म्हणतात. याच्या वाढत्या प्रमाणामुळे  यकृत आणि हृदयाच्या आजारांची शक्यता वाढते आणि इतर शारीरिक समस्याही होऊ शकतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

हायपरफॉसफेटएमियाची कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे नसतात. याची लक्षणे पुढील काही आजारांशी संबंधित असू शकतात.

 • जास्त फॉस्फेट चे प्रमाण अनेकदा रक्तातील कॅल्शिअम चे प्रमाण कमी होण्यास कारणीभूत असते ज्यामुळे हाडे ठिसूळ होतात.
 • फॉस्फेट चे प्रमाण वाढलेल्या रूग्णांमध्ये स्नायू उबळ ही सामान्य तक्रार असते.
 • याच्या रुग्णाची त्वचा कोरडी, रुक्ष आणि खपल्या असलेली असते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

 • जर मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत चालू नसेल तर शरीरातील जास्तीचे फॉस्फेट काढून टाकले जात नाही, त्यामुळे रक्तातील फॉस्फेटचे प्रमाण वाढते. फॉस्फेट च्या रक्तातील वदलेल्या मात्रेमुळे क्रोनिक मूत्रपिंडाचा विकार किंवा मूत्रपिंड निकामी होणे यांसारखे आजार होतात.
 • काहीवेळा कमी झालेल्या पॅराथायरॉईड या हार्मोन मुळेही फॉस्फेट सिरम वाढू शकते.
 • त्याचप्रमाणे कमी झालेल्या कॅल्शिअममुळेही फॉस्फेटचे प्रमाण वाढते
 • मधुमेह किंवा केटोॲसिडोसिस यांसारख्या अंतःस्रावी परिस्थिती सुद्धा फॉस्फेट च्या जास्त प्रमाणामुळे होतात.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

जर तुम्हाला हायपरफॉस्फेटेमिया ची लक्षणे जाणवत असतील तर तुमचे डॉक्टर तुमच्या वैद्यकीय इतिहासावरून तुमची शारीरिक तपासणी करतात आणि त्यांनतर पुढील परिस्थीची खात्री करण्यासाठी निरीक्षण केले जाते.

 • रक्त चाचणी ही पहिले चाचणी असते ज्यावरून रक्तातील फॉस्फेटचे वाढलेले प्रमाण तपासले जाते. जास्त शर्करा आणि असामान्य कॅल्शिअम चयापचय क्रियाही रक्त चाचणीतून तपासले जाते.
 • हाडांच्या नुकसानाची काही शंका असल्यास एक्स-रे काढला जाऊ शकतो.

  या आजाराचा उपचार हा त्याचा कारणांवर अवलंबून असतो आणि त्यात पुढील पद्धती समाविष्ट असतात:
   
 • मूत्रपिंडाच्या विकृतीसाठी आहार नियम पाळणे महत्वाचे असते.काही प्रकरणांत औषधंसोबतच  रक्त शुद्धीकरण प्रक्रियाही आवश्यक असते.
 • मधुमेह हे अंतर्गत कारण असल्यास इन्श्युलिन चा सल्ला दिला जातो.
 • कमी प्रमाणात कॅल्शिअम आढळ्यास कॅल्शिअम पुरकांचा सल्ला दिला जातो. कॅल्शिअम बाइंडर्स नामक औषधांचा संच या परिस्थितीत उपयुक्त ठरतो.
 • आजाराच्या कारण काहीही असले तरी निर्णायक व्यवस्थापनासाठी मांस, कुक्कुट, मासे आणि नट्स यांसारखे जास्त फॉस्फेट असलेले पदार्थ टाळावे.
 1. रक्तामध्ये फॉस्फेटचे स्तर वाढणे साठी औषधे

रक्तामध्ये फॉस्फेटचे स्तर वाढणे साठी औषधे

रक्तामध्ये फॉस्फेटचे स्तर वाढणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Acutrol C खरीदें
Acutrol खरीदें
Forsemer खरीदें
Foschek S खरीदें
Foseal खरीदें
Phoscut खरीदें
Renvela खरीदें
Revlamer खरीदें
Sevbait खरीदें
Sevcar खरीदें
Biosev खरीदें
Biosev C खरीदें
Foseal C खरीदें
Nephlomer खरीदें
Sevhold खरीदें
Sevlaren खरीदें
Sevlogen खरीदें
Sevpos खरीदें
Zynacar खरीदें
Lexorus खरीदें
Pebind खरीदें
Selbo खरीदें
Fosbait खरीदें
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें