myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) काय आहे?

एकूण 120 प्रकारचे  एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) आहे  ज्यापैकी  40 असे आहे जे  संभोगाद्वारे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाते.

एचपीव्ही संसर्ग हा एक सामान्य संसर्ग आहे जे जास्तीत जास्त संभोगाद्वारे पसरते आणि हे दोन्ही स्त्री आणि पुरुषाला प्रभावित  करते .

याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

 • एचपीव्हीची  लक्षणे हे कोणत्या प्रकारच्या विषाणूने   शरीरात प्रवेश केला आहे त्यावर अवलंबून  असते.
 • बरेचशे एचपीव्ही विषाणूच्या जाती  मस/चामखीळ बनवतात. हे अनियमित उंचवटे चेहऱ्यावर, हातावर, मानेवर आणि गुप्तांगाजवळ येतात.
 • एचपीव्ही वरच्या श्वसन मार्गाला क्षती पोहोचवते जे सामान्यपणे टॉन्सिल्स, लॅरिंक्स आणि घशामध्ये आढळते.
 • काही प्रकारचे विषाणू हे महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर आणि ओरोफॅरिंगेल कॅन्सर ला कारणीभूत असतात. तोंडाचा आणि घशाचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो.
 • जेव्हा विषाणू मूळे  सर्व्हायकल कॅन्सर  होतो , तेव्हा त्याची  लक्षणे ऍडव्हान्स स्टेज पर्यंत  दिसून येत नाही .

याचे  मुख्य कारण  काय?

 • एचपीव्ही साधारणपणे शरीरात संसर्ग असलेल्या व्यकीतीशी लैंगिक संबंध झाल्यास पसरतो, कारण  हा विषाणू पसरण्याचे संभोग हा कॉमन मार्ग आहे. (अधिक वाचा:  सुरक्षित  संभोग कसा  करायचा)
 • एकापेक्षा जास्त व्यक्तीसोबत संभोग केल्याने आणि तोंडावाटे संभोग केल्याने संसर्ग होण्याचा धोका आणखी वाढतो.
 •  एड्स  झालेला  रुग्ण आणि  इतर प्रतिकारशक्ती शी  संबंधित रोगामुळे एचपीव्ही चा संसर्ग सहज होऊ शकतो.
 • हे  शरीरात उघडी जखम, कापणे, किंवा असुरक्षित/खुल्या त्वचेमधून शरीरात प्रवेश करू शकतात.
 • संभोगा व्यतिरिक्त हा विषाणू संबंधित व्यक्तीच्या चामखिळीला स्पर्श केल्यास पसरतो. 

याचे निदान आणि उपचार काय आहे?

 • निदानासाठी आलेल्या व्यक्तीची शारीरिक तपासणी करताना डॉक्टर चामखिळीला तपासतात. वैद्यकीय आणि लैंगिक माहिती घेणे सुद्धा आवश्यक आहे
 • जर एचपीव्ही चा संसर्ग झाल्याची शंका असेल तर, कापसाचा तुकडा घेऊन गर्भाशयात फिरवून त्यावर येणाऱ्या सेल्स मध्ये काही विकृती तर नाही ना यासाठी  पॅप स्मिअर टेस्ट द्वारे तपासणी केली जाते .
 • जे  एच पी व्ही विषाणू सर्व्हायकल  कॅन्सर साठी कारणीभूत आहे त्यांचे निदान गर्भाशयाच्या सेल्स  मध्ये विषाणूचे डी एन ए आहे कि नाही हे प्रयोगशाळेत चाचणी करून खात्री केली जाते.

या विषाणूंना मारण्यासाठी कोणतेही उपचार नाही. हे कोणत्याही हस्तक्षेपा शिवाय सुप्त राहतात किंवा नाहीसे होतात.

 • एच पी व्ही मूळे झालेल्या सौम्य चामखिळी साठी, डॉक्टर तोंडावाटे घ्यायचे औषध देतात आणि टॉपिकल क्रीम देतात .
 • जर औषधाद्वारे चामखिळी गेली नाही,तर लेसर किंवा क्रायो उपचार पद्धतीने शस्त्रक्रिया करून चामखीळ काढली जाते.
 • जर एच पी व्ही मूळे कॅन्सर झाला असेल, तर व्यापक उपचारपद्धती, जसे केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी ची गरज पडू शकते.
 • एच पी व्ही मूळे होणाऱ्या  सर्व्हायकल कॅन्सर साठी प्रतिबंधित लस उपलब्ध आहे, तरीही महिलांनी याचा संसर्ग होऊ नये म्हणून काही  प्रतिबंधित उपाय करायला पाहिजे जसे संभोग करत असतांना कंडोम चा उपयोग करणे.

 

 1. एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) चे डॉक्टर
Dr. Jogya Bori

Dr. Jogya Bori

संक्रामक रोग

Dr. Lalit Shishara

Dr. Lalit Shishara

संक्रामक रोग

Dr. Alok Mishra

Dr. Alok Mishra

संक्रामक रोग

और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें