myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

फायब्रोमायल्जिया काय आहे?

फायब्रोमायल्जिया एक वेदनादायक स्थिती आहे जी संपूर्ण शरीराच्या स्नायूंना प्रभावित करते. या स्थितीत असणाऱ्या व्यक्ती सामान्यतः हा आजार नसणाऱ्या इतर व्यक्तींपेक्षा वेदनांना अधिक संवेदनशील असतात. भारतात, लोकसंख्येच्या 0.5% ते 2% वर याचा परिणाम होतो. महिलांमध्ये हे सामान्य आहे; पुरुषांपेक्षा जवळजवळ 3-7 पटीने जास्त आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

वारंवार येणारे लक्षणे अशी आहेत:

 • संपूर्ण शरीरावर वेदना, कोमलता आणि ताठरता,  विशेषत: काही विशेष जागांवर.
 • सुस्त वाटणे.
 • नीट झोपण्यास अक्षमता.
 • तीव्र डोकेदुखी.
 • गंभीररित्या मासिक पाळीत दुखणे.
 • संवेदनशून्यता किंवा पायातली शक्ती जाणे.
 • स्मरणशक्तीत समस्या.
 • निराशाजनक भाग (अधिक वाचा: उदासीनता लक्षणे).

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो. या आजाराने ग्रस्त स्त्रियांमध्ये सकाळी थकवा, संपूर्ण शरीर दुखणे आणि त्रासदायक आंत्र सिंड्रोमचा अनुभव येतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

या अवस्थेचे अचूक कारण अजून ज्ञात नाही आहे पण, असे म्हटले जाते की हे आनुवांशिकतेने होऊ शकते. त्यांना इतरांपेक्षा वेदना अधिक तीव्रतेने अनुभवू शकतात. या अवस्थेची उकल करणारे ट्रिगर घटक हे आहेत:

 • हार्मोनल बदल.
 • ताण पातळी.
 • हवामान बदल.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदानामध्ये सविस्तर वैद्यकीय इतिहास जाणून घेतला जातो, जेथे रुग्णाच्या स्थितीची तीव्रता, कोमलता, ट्रिगर्स आणि इतरांविषयी विचार केला जाऊ शकतो. लक्षणे बहुधा बऱ्याचदा परिस्थितीचे स्पष्ट चित्र प्रदान करतात. शरीराच्या वेदना आणि सुस्ती साठी कारणीभूत ठरणाऱ्या इतर अवस्थेच्या कारण वगळता प्रयोगशाळा चाचण्या आवश्यक नाहीत. रुग्णाला ही परिस्थिती समजून घेण्यास कित्येक वर्षे लागू शकतात. इमेजिंग, विशेषतः एक्स-रे  इतर रोगांचे शंकानिरसन करण्यासाठी केले जाऊ शकते.

उपचारांमध्ये सहसा औषधे आणि नॉन-ड्रग पद्धतींचा समावेश असतो:

 • वेदना दूर करणारे औषध.
 • दररोज ताकद वाढवण्यासाठी व्यायाम करणे.
 • झोप सुधारण्याची तंत्रे.
 • योग, किंवा ध्यान करून ताण व्यवस्थापन.
 • संवेदनात्मक वर्तणूक थेरपीमुळे उदासीनता किंवा चिंता व्यवस्थापित केली जाऊ शकते.

स्वत: च्या काळजीसाठी टिप्सः

 • शारीरिक व्यायाम करणे आणि ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवणे लक्षणे नियंत्रित करण्यात मदत करू शकते.
 • स्वयं-देखभाल वर्ग दररोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये  अडचणी दूर करण्यात मदत करू शकतात.

ही आयुष्यभरासाठी गंभीर स्थिती असल्यामुळे, जीवनशैली सुधारण्यासाठी लक्षणे-मुक्त करण्याचे तंत्र सहसा फायदेकारक असतात. योग्य फॉलो-अप आणि वैद्यकीय चिकित्सकाशी सल्लामसलत संबंधित कोणत्याही प्रश्नांबद्दल आत्मविश्वास पुनर्संचयित करण्यात मदत होऊ शकते आणि फायब्रोमायल्जीया सुधारू शकते.

 1. फायब्रोमायल्जिया साठी औषधे
 2. फायब्रोमायल्जिया चे डॉक्टर
Dr. Kamal Agarwal

Dr. Kamal Agarwal

ओर्थोपेडिक्स

Dr. Rajat Banchhor

Dr. Rajat Banchhor

ओर्थोपेडिक्स

Dr. Arun S K

Dr. Arun S K

ओर्थोपेडिक्स

फायब्रोमायल्जिया साठी औषधे

फायब्रोमायल्जिया के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
G Neuro खरीदें
Pregeb M खरीदें
Pregalin खरीदें
Milnace खरीदें
Libotryp Tablet खरीदें
Pregalin M खरीदें
Acmil खरीदें
Amitar Plus Tablet खरीदें
Neuroxetin खरीदें
Engaba खरीदें
Milborn खरीदें
Amitop Plus खरीदें
Mecobion P खरीदें
Rejunuron Dl खरीदें
Ezegalin खरीदें
Amitril Plus खरीदें
Mecoblend P खरीदें
Dulane M खरीदें
Gabacure खरीदें
Milpran खरीदें
Amitryn C खरीदें
Mecofort Pg खरीदें
Dumore M खरीदें

References

 1. Office on women's health [internet]: US Department of Health and Human Services; Fibromyalgia
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Fibromyalgia
 3. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Fibromyalgia
 4. National Center for Complementary and Integrative Health [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Fibromyalgia: In Depth
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Fibromyalgia
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें