myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

पचनसंस्थेचे विकार म्हणजे काय?

पोट, लहान आतडे आणि कोलन तसेच यकृत, पित्ताशय, बिलीअरी ट्रॅक्ट आणि स्वादुपिंड सारखे अवयव आणि पचन मार्ग संबंधित विकारांना पचनसंस्थेचे विकार किंवा गॅस्ट्रोइंटेस्टीनल विकार असे म्हणतात. या विकारांमधे पॅनक्रियाटायटीसबद्धकोष्ठता, अतिसार, क्रॉन रोग, इरीटेबल बॉवेल सिंड्रोम (आयबीएस)छातीत जळजळ, गॉलस्टोन्स , कोलायटिस, अल्सर, हर्निया यासारख्या आणि इतर अनेक आजारांचा समावेश आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

पचनसंस्थेच्या विकारांचे काही सामान्य लक्षणे आणि चेतावणी देणारी चिन्हे अशी आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

पचनसंस्थेचे विकार खालीलपैकी एक किंवा अनेक कारणांमुळे होऊ शकतात:

सामान्य कारणे :

 • मायक्रोबियल संसर्ग.
 • अन्ननलिकेत जळजळ होणे.
 • पाचन एंझायीमची कमतरता.
 • आतड्यांना पुरेसे रक्त न मिळणे.
 • गॉलस्टोन्स तयार होणे.
 • अँटी-इंफ्लेमेटरी औषधांचे दुष्परिणाम.
 • ताण.
 • धूम्रपान.
 • दारू पिणे.
 • चरबी वाढविणाऱ्या पदार्थांचे अति सेवन करणे.
 • मसालेदार अन्न सेवन करणे.
 • अनुवांशिक कारणे: काही विशिष्ट जिन्सच्या उक्तीमुळे पॅनक्रियाटीटीस, यकृत रोग आणि क्रॉन्स रोग यासारखे आजार होऊ शकतात.
 • पोस्ट-सर्जिकल कारणेः पित्ताशय काढून टाकण्यासाठी किंवा आतड्यांचा एक भाग काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेमुळे पचनसंस्थेचे विकार होऊ शकतात.
 • ऑटो इम्म्युन इंफ्लेमेटरी आणि क्रॉनिक रोग: शोग्रन सिन्ड्रोम, ह्रमाटोइड आर्थ्ररायटीस आणि सिस्टेमिक ल्यूपस एरिथेमॅटोसस (एसएलई) सारख्या विकारांमुळे पचनसंस्थेचे विकार होऊ शकतात. यकृत, कोलन आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगा मुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतात.
 • वयः वाढत्या वयामुळे पचन तंत्र कमकुवत होऊ शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

पचनसंस्थेचे विकार पचनक्रियेत एक किंवा अनेक अवयवांवर परिणाम करू शकतात. वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी आणि प्रयोगशाळेतील चाचण्या हे तीन मूलभूत निदान आहेत.

 • वैद्यकीय इतिहास: आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी,जीवनशैली आणि मलविसर्जनाच्या सवयी, आणि मनोवैज्ञानिक परीक्षण, हे आपल्या डॉक्टरांना पुढील चाचण्या ठरविण्यास मदत करते.
 • शारीरिक तपासणी: हात आणि स्टेथस्कोप च्या साहाय्याने पोटाची तपासणी करून पोटात काही अस्वाभाविकता आहे का हे बघितले जाते.
 • प्रयोगशाळेतील चाचण्या:
  • शौचाची चाचणी.
  • एन्डोस्कॉपी.
  • अन्ननलिकेचे इंट्यूबेशन.
  • लॅपरोस्कोपिक चाचणी.
  • पोटातील द्रवाची चाचणी.
  • ऍसिड रिफ्लक्स चाचणी.
  • इमेजिंग तंत्र जसे सामान्य आणि बेरियम जीआयटी एक्स-रे, आणि एमआरआय आणि पोटाचे सीटी स्कॅन.
  • ओटीपोटाचे अल्ट्रासाऊंड इमेजिंग.

रोगाच्या निदानावर उपचार अवलंबून असतात. खालील धोरणे उपचार यशस्वी करू शकतात:

 • आपले ट्रिगर घटक ओळखा: आपण आपल्या पाचन समस्या खराब करणाऱ्या विशिष्ट पदार्थ आणि सवयींवर लक्ष केंद्रित करू शकता. डॉक्टर आणि आहारविज्ञानाकडून योग्य सल्ला घेऊन आपण या समस्येवर मात करू शकता.
 • औषधे: आपल्या लक्षणांवर अवलंबून अँटी-डायरियल,अँटी-नौशिया, एन्टी-एमेटिक आणि अँटीबायोटिक्स दिले जाऊ शकतात.
 • शस्त्रक्रिया: आपल्याला गॅल्स्टोन, ऍपेंडिसाइटिस आणि हर्नियासारख्या विकारांसाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
 • एन्डोस्कोपी: गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्रावासाठी, हेमोस्टॅटिक औषधांची एंडोस्कोपिक डिलीवरी दिली जाऊ शकते.

पचनसंस्थेच्या विकारांपासून आपल्याला सोडविण्यासाठी हे उपचार उपलब्ध असले तरी जीवनशैलीत काही सामान्य बदल हा विकार टाळू शकतात:

 • व्यायाम.
 • योग आणि ध्यान.
 • स्वच्छतापूर्ण आहाराची सवय, निश्चित आणि नियमित आहार.
 • आतडे पुन्हा भरण्यासाठी प्रोबायोटिक्सचा वापर.

आपल्या दैनंदिन जीवनात आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल केल्याने पचनसंस्थेचे विकार टाळता येतात. औषधे आणि शस्त्रक्रिया हा विकार पूर्णपणे बरे करू शकतात. कोणत्याही पर्यायी थेरपीची निवड करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 1. पचनसंस्थेचे विकार साठी औषधे
 2. पचनसंस्थेचे विकार चे डॉक्टर
Dr. Mahesh Kumar Gupta

Dr. Mahesh Kumar Gupta

Gastroenterology
11 वर्षों का अनुभव

Dr. Raajeev Hingorani

Dr. Raajeev Hingorani

Gastroenterology
9 वर्षों का अनुभव

Dr. Vineet Mishra

Dr. Vineet Mishra

Gastroenterology
8 वर्षों का अनुभव

Dr. Ankit Gangwar

Dr. Ankit Gangwar

Gastroenterology
3 वर्षों का अनुभव

पचनसंस्थेचे विकार साठी औषधे

पचनसंस्थेचे विकार के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Ocid खरीदें
Rantac खरीदें
Zinetac खरीदें
Aciloc खरीदें
Omez D खरीदें
Omez खरीदें
Aristozyme खरीदें
Reden O खरीदें
ADEL 28 खरीदें
Bonipraz खरीदें
R T Dom खरीदें
ADEL 29 खरीदें
Bromez खरीदें
Capcid खरीदें
Capocid खरीदें

References

 1. Craig OF, Quigley EM. Current and emerging therapies for the management of functional gastrointestinal disorders. Ther Adv Chronic Dis. 2011 Mar;2(2):87-99. PMID: 23251744
 2. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Digestive Diseases
 3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Digestive Diseases
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Digestive diseases
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Digestive Diseases
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें