myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

डर्मटायटिस काय आहे?

डर्मटायटिस ही त्वचेवर येणारी सूज आहे जी अनेक परिस्थिती एकत्र आल्याने होऊ शकते. हे बऱ्याचदा मुलांवर (15% -23% जागतिक पातळीवर) परिणाम करते. तथापि, भारतीय मुलांमध्ये प्रसार आणि घटना कमी असल्याचे आढळून आले आहे.

डर्मटायटिसचे सर्वात सामान्य प्रकार पुढील प्रमाणे आहेत:

 • आटोपीक डर्मटायटिस.
 • कॉन्टॅक्ट डर्मटायटिस.
 • सेबॉऱ्हिक डार्माटायटीस.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सामान्य लक्षणांमध्ये खालील समाविष्ट आहे:

 • लालसरपणा.
 • वेदना.
 • पापुद्रा असलेला फोड होणे.
 • खूप खाजवणे.
 • सूज.

विशिष्ट लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

 • आटोपीक डर्मटायटिस: हा नवजात शिशुंमध्ये पाहिला जातो. विशेषत: यात त्वचेला घडी पडते जसे की कोपराच्या आत आणि गुडघ्यांच्या मागच्या भागात पहायला मिळते.
 • कॉन्टॅक्ट डर्मटायटिस: त्वचेवर सूज येते किंवा हुळहुळते, त्वचेवरील रॅश भाजल्यासारखी दिसू लागते, खाजवणा ऱ्या भागावर जळजळ होते.
 • सेबॉऱ्हिक डार्माटायटीस: त्वचेवर खवल्यासारखे लालसर डाग आणि कोंडा होऊ शकतो. अर्भकांमधे, हे डोक्याच्या शीर्षस्थानी दिसून येते आणि त्याला क्रॅडल कॅप म्हणून ओळखले जाते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

कोणतेही आनुवांशिक कारण, ॲलर्जी, विविध मूलभूत आरोग्यविषयक परिस्थिती किंवा त्वचेचे इतर कोणत्याही प्रकारचे बाधक डर्मटायटिस होऊ शकतो.

वेगवेगळ्या प्रकारचे डर्मटायटिस त्यांच्या कारणानुसार खालील प्रमाणे आहेत:

 • आटोपीक डर्मटायटिस आनुवंशिक घटक, बिघडलेली रोगप्रतिकारकशक्ती, जीवाणूंच्या आक्रमण किंवा बाह्य घटकांमुळे होऊ शकतै.
 • विषारी पदार्थांशी थेट संपर्क, जसे की पॉयझन आयव्ही, निकेल असलेले आभूषण, स्वच्छ करणारे एजंट, स्ट्रॉंग परफ्यूम, सौंदर्यप्रसाधने आणि प्रिझर्व्हेटिव्ह पदार्थांमुळे देखील कॉन्टॅक्ट डर्मटायटिस होऊ शकतो.
 • सेबॉऱ्हिक डार्माटायटीस तणाव, थंड आणि कोरडे हवामान, व्यक्तीच्या त्वचेवर यीस्ट आणि संपूर्ण आरोग्यासारख्या बऱ्याच कारणांमुळे होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर चिन्ह आणि लक्षणांबद्दल विचारू शकतात. ॲलर्जी पॅच चाचणी हा कोणत्याही प्रकारची ॲलर्जी ओळखण्यासाठी वापरले जाणारे मुख्य निदान साधन आहे. शिवाय पुढील चाचण्या केल्या जातातः

 • प्रिक किंवा रेडिओॲलर्जोसोर्बंट (आरएएसटी) चाचणी.
 • जंतूंची कृत्रिम वाढ तपासण्यासाठी त्वचेचा स्वॉब.
 • त्वचेची बायोप्सी.

लक्षणे / दाहांची तीव्रता किती आहे यावर उपचार अवलंबून असतात.

 • टॉपिकल स्टिरॉइड क्रीम सामान्यत: निर्धारित केले जातात.
 • प्रतिकारशक्तीवर परिणाम करणाऱ्या टॉपिकल क्रीम देखील निर्धारित केले जाऊ शकतात.
 • प्रकाश उपचार किंवा फोटोथेरपीचा वापर केला जाऊ शकतो.

स्वत:ची काळजी घ्यावयाच्या टिप्सः

 • निर्धारित न केलेली औषधे किंवा अँटी-इच उत्पादनांचा काळजीपूर्वक वापर करा.
 • थंड किंवा ओले कॉम्प्रेशन्स त्वचेला शांत करु शकतात.
 • उबदार पाण्याने आंघोळ केल्याने लक्षणे दूर होऊ शकतात.
 • सूजलेल्या त्वचेला खरवडणे किंवा चोळणे टाळा.

डर्मटायटिस ही त्रासदायक परिस्थिती आहे कारण आपली त्वचा असंख्य गोष्टींच्या संपर्कात येऊ शकते आणि परिस्थिती बिघडते. सुरुवातीच्या काळात योग्य काळजी आणि उपचार जास्तीत जास्त फायदा देऊ शकतात.

 1. डर्मटायटिस साठी औषधे

डर्मटायटिस साठी औषधे

डर्मटायटिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Betnesol खरीदें
Aerocort खरीदें
Exel Gn खरीदें
Propyderm Nf खरीदें
Propygenta Nf खरीदें
Propyzole खरीदें
Propyzole E खरीदें
Canflo Bn खरीदें
Tenovate Gn खरीदें
Toprap C खरीदें
Crota N खरीदें
Clop Mg खरीदें
Canflo B खरीदें
Sigmaderm N खरीदें
Clovate Gm खरीदें
Fucibet खरीदें
Rusidid B खरीदें
Tolnacomb Rf खरीदें
Cosvate Gm खरीदें
Fusigen B खरीदें
Low Dex खरीदें
Propyzole Nf खरीदें
Xeva Nc खरीदें

References

 1. Yasha Upendra et al. The clinico-epidemiological profile of atopic dermatitis in residential schoolchildren: A study from South Chhattisgarh, India. Department of Dermatology; Year : 2017 Volume : 18 Issue : 4 Page : 281-285
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Eczema
 3. Australasian College of Dermatologists. Dermatitis/Eczema. Australia; [Internet]
 4. American Academy of Dermatology. Rosemont (IL), US; Atopic dermatitis
 5. National Eczema Association. Contact Dermatitis. San Marin Drive; [Internet]
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें