myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

सारांश

कांजण्या हे जनुकीय संसर्ग आहे आणि हा संसर्ग झाल्यास रुग्णामध्ये तापासारखी लक्षणे दिसतात. पुरळ सदृश खाजा येणारे डाग शरीरभर तयार होतात. वेरीसेला लसीच्या वापराने कांजण्या हा आजार विरळ झाला आहे. जंतूचा रुग्णाच्या शरीरात प्रवेश झाल्यावर 10 ते 21 दिवसांत लक्षणे दिसायला सुरुवात होतात आणि पुढील 5 ते 10 दिवसांपर्यंत ती लक्षणे तशीच राहतात. पुरळ यायच्या आधी, डोकेदुखी आणि ताप अशी लक्षणे रुग्णामध्ये दिसतात. पुरळ आल्यानंतर ही लक्षणे तीन अवस्थांमधून जातात: आधी लागण झालेल्या जागी गुलाबी उंचवटा किंवा लाल टेंगुळ येते, मग तो भाग द्रव्ययुक्त फोडात रुपांतरीत होते आणि शेवटी त्याची खपली बनते. सामान्यतः, कांजण्या हा एक सौम्य आजार आहे, परंतु त्याचे पर्यावसान गंभीर गुंतागुंतीत जसे न्युमोनिया, इंसेफलाइटीस, रेयेज सिंड्रोम मधे होते. जे लोक कांजण्या आणि निर्जलीकरणाच्या वेळी अस्प्रीन घेतात त्यांना हा धोका अधिक संभवतो. अधिक धोका असलेल्या लोकांमध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

सुदृढ बालकांना कांजण्यांसाठी वैद्यकीय उपचारांची गरज नाही. खाज कमी करायला एलर्जी प्रतिबंधात्मक औषधे देतात. धोक्याच्या गुंतागुंती असलेल्या लोकांना डॉक्टर, आजाराची तीव्रता कमी करणारी प्रतिजनुकीय औषधे देतात, आणि आजाराची तीव्रता कमी करण्यास किंवा बचावासाठी कांजण्याची लस टोचून घेण्याचा सल्ला देतात. लोकांनी जर लस टोचून घेतली असेल तर त्यांना कांजण्या होत नाहीत, तरीही, लस घेतलेल्या व्यक्तीला कांजण्या झाल्या तरीही त्या सौम्य असतात. कांजण्याची लस सुरक्षित, प्रभावी, आणि आजारापासून बचावासाठी उत्कृष्ट उपाय आहे. लस तीव्र कांजण्यांच्या सर्व घटनांपासून बचाव करते.

 1. कांजण्या रोग ची लक्षणे - Symptoms of Chicken Pox in Marathi
 2. कांजण्या रोग चा उपचार - Treatment of Chicken Pox in Marathi
 3. कांजण्या रोग साठी औषधे
 4. कांजण्या रोग चे डॉक्टर

कांजण्या रोग ची लक्षणे - Symptoms of Chicken Pox in Marathi

ज्या व्यक्तींना कांजण्यासाठी लस टोचून घेतली नसेल त्यातील प्रत्येकाला कांजण्या होऊ शकतात. कांजण्या झाल्यानंतर 5-7 दिवस त्याचे आजार राहतात. कांजण्याशी संबंधित विशिष्ट पुरळ दिसायला लागतात. हे पुरळ तीन बदलांमधून जाते:

 • पहिले, गुलाबी किंवा लाल टेंगुळ-सदृश्य उंचवटा ज्याला पॅप्यूल्स म्हणतात येते. पुढील काही दिवस या पॅप्ल्यूस किंवा उंचवट्यांचा उद्रेक होतो.
 • नंतर हे टेंगुळ, तरळ पदार्थाने भरलेल्या छोट्या फोडांमध्ये, ज्यांना वेसिकल्स म्हणतात, रुपांतरीत होतात. एक दिवसानंतर ते टेंगुळ फुटून वाहायला लागतात.
 • सर्वांत शेवटी, फुटलेल्या फोडांना खपल्या येतात आणि त्या भरायला वेळ घेतात.

नवे टेंगुळ बरेच दिवस येत राहतात. त्यामुळे एखाद्याला पुरळ आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून, पुरळीच्या तीनही पायऱ्या, टेंगुळ, फोड, आणि खपलीची जखम, असू शकतात. एकदा संसर्ग झाल्यावर पुरळ दिसायच्या आधी चोवीस तासात जंत सगळीकडे पसरतात. सर्व डाग निघून जाईपर्यंत संसर्ग संक्रामक अवस्थेत असतो. पुरळ आधी छाती, पाठ, आणि चेहऱ्यावर दिसतात, नंतर ते उरलेल्या शरीरावर जसे गुप्तांग, डोळ्यांच्या झापडी, किंवा तोंडाच्या आत पसरतात. सगळ्या फोडी एका आठवड्यात खपल्या बनतात. पुरळ यायच्या एक दोन दिवस आधी काही सामान्यतः दिसणारी लक्षणे दिसतात. ही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

लस टोचलेल्या व्यक्तींना सुद्धा कांजण्या होऊ शकतात. लस टोचलेल्या लोकांमध्ये दिसणारी लक्षणे सौम्य असतात. अशा लोकांना हलका ताप असतो किंवा नसतो सुद्धा, कमी फोडी किंवा लाल डाग असतात. तरीही काही लस टोचलेल्या लोकांना, लस न टोचलेल्या लोकांना असतात तसे, गंभीर आजार असतात.

तुमच्या डॉक्टरांना बोलवायला विसरू नका जर:

 • तुम्हाला कांजण्या संसर्गसदृश असल्यास (पू वाहणे, खपल्यांचे मोठे होणे).
 • सहा दिवसांनी तुम्हाला पुन्हा नव्याने कांजण्या झाल्यास
 • तुमच्या बाळाची परिस्थिती गंभीर होत असल्यास.

कांजण्या रोग चा उपचार - Treatment of Chicken Pox in Marathi

सुदृढ व सशक्त बालकांमधे कांजण्यांवर वैद्यकीय उपचार घेण्याची गरज नाही. उपचार साधारणतः आधारभूत असतात ज्यांचा उद्देश लक्षणांना दूर करणे आणि संसर्ग रोखणे असा असतो. तुमचे डॉक्टर पुरळीतील खाजेवर नियंत्रण मिळविण्यासाठी एलर्जी प्रतिबंधक औषधे (एन्टीहीस्टामैन) निर्धारित करतात. एन्टीहीस्टामैन पोटातून घेतल्याने खाज सुटलेले पुरळ आणि फोडी, विशेष करून झोपल्यावर, कमी त्रास देतील. एन्टीहीस्टामैन अवरोधक वापरायचे असल्यास लेबल वरील दिशानिर्देश काळजी पूर्वक वाचून घ्या.

कांजण्या वेळ पडल्यास गुंतागुंत वाढवू शकतात. असे असल्यास, डॉक्टर तुम्हाला संसर्गाचा काळ कमी करायलाआणि गुंतागुंती कमी करण्याची औषधे देतील.

 •  बालकांमध्ये गुंतागुंतीचा धोका असल्यास डॉक्टर पुढील सल्ला देतील:
 • प्रतीजनुकीय औषधे –ऍसिक्लोव्हीर
 • इंट्रावेनस इम्युनोग्लोब्यूलीन

पहिली पुरळ आल्यानंतर चोवीस तासांच्या आत हे औषध दिल्यास आजाराची तीव्रता कमी होते.

आजाराची  तीव्रता कमी करायलाइतरही काही प्रतिजनुकीय, जसे फाम्सिक्लोव्हिर आणि व्हॅलासीक्लोव्हीर, देतात, परंतु सगळ्याच घटनांमध्ये सुद्धा औषधे देणे योग्य नाही.

 • काही बाबतीत रुग्णाला जंतूंची लागण झाली असेल तर डॉक्टर तुम्हाला तीव्रता कमी करण्यास किंवा आजारापासून बचाव करण्यास लसीकरणाचा सल्ला देतात.
 • जर आजाराची तीव्रता वाढली असेल तर डॉक्टर तुम्हाला योग्य उपचार निर्धारित करतील. जर न्युमोनिया आणि त्वचेचा संक्रमण झाला असेल तर डॉक्टर तुम्हाला प्रतिजैविकेसुद्धा देतात. जर तुमच्यात एन्सेफलायटीस विकसित झाला असेल तर तुम्हाला प्रतिजनुकीय औषधे देतात. इस्पितळात भरती होण्याची पाळी सुद्धा येऊ शकते.

कांजण्यायेण्याच्या दोन दिवस आधी आणि डाग जाईपर्यंत जवळपास पाच दिवसांचा वेळ जातो. यापाच दिवसांत कांजण्या असलेली व्यक्ती रोग संक्रमीत करू शकते.

स्वतःची काळजी

कांजण्यांमधे होणाऱ्या आरोग्याच्या परिस्थितीला हाताळायला स्वतः करण्यासारख्या खालील काही गोष्टी:

 • थंड पाण्याने अंघोळ करा: खाज कमी करायला थंड पाण्याची अंघोळ मदत करते. अंघोळीने कांजण्या पसरणे थांबते. तुम्ही 2 ओझी (56. 669 ग्राम) प्रती बाल्टी या प्रमाणात पाण्यात सोडासुद्धा मिसळू शकता.
 • बेनाड्रील वापरा. रुग्णाची खाज अनियंत्रित झाल्यास किंवा त्यामुळे झोपेतील व्यत्ययामुळे पोटातून बेनाड्रिल दिले जाईल. तुम्ही अधिक खाज असलेल्या ठिकाणी बेनाड्रील क्रीमसुद्धा लाऊ शकता. कॅलामाईन मलमाचा वापर करा. खूप जास्त खाज असलेल्या ठिकाणी कॅलामाईन मलमाचा वापर करू शकता. त्या भागाला १० मिनिटे बर्फाने मालीश करण्याचा विकल्प देखील आहेच. (बेनाड्रील लावलेला भाग सोडून द्या कारण ते शोषून घेतले गेल्यामुळे चामडीला दाह होऊन दुष्परिणाम संभवतात).
 • खाजवू नका: सुक्ष्मजंतूंना प्रतिबंध करणाऱ्या साबणाने वारंवार हात धुवा आणि इम्पेटीगोसारख्या चामडीच्या संसर्गाला रोखण्यासाठी बोटांची नखे कापा. फोडांची खपली काढायचे आणि खाजवायचे टाळा.
 • ताप कमी करा: ताप 39⁰ C वर जात असल्यास पॅरासिटामोल(एसेटोमीनाफेन) घ्या. कांजण्या असताना कधीही एस्प्रीन घेऊ नका, त्याने रेयेज सिंड्रोम नावाचा धोकादायक आजार बळावण्याची शक्यता असते. कांजण्यांमधे आयबृफेनसारख्या वेदनाशामक घेऊ नका कारण त्याने स्ट्रेप्टोकोकसचा धोका होण्याची संभावना आहे.
 • हलका आहार निवडा: तुम्हाला जर घशाचा अल्सर असेल किंवा तोंड दुखत असल्यास, हलके आहार घ्या. तरळ पदार्थ बाटली ऐवजी कपाने द्या, जेणेकरून बाटलीच्या काठाचा त्रास होणार नाही. (आणखी वाचा – तोंडाच्या अल्सरचे उपचार)
 • तोंडाच्या दुखण्यावर अँटॅसिड वापरा. चार वर्षाच्या वरील मुलांकडून, तोंडाच्या तीव्र अल्सरसाठी, जेवण झाल्यानंतर, एक चमचा अँटॅसिड वापरून, चारवेळा गुळण्या करवून घ्या. मोठ्यावयाच्या मुलांच्या मुखाच्या पुढच्या भागात जेवण झाल्यावर तरलअँटॅसिडचे काही थेंब टाका.
 • लघवीतील वेदना कमी करायला पेट्रोलियम जेली वापरा: स्त्रियांच्या व्हल्व्हा भागात वेदनादायक अल्सर असल्यास पेट्रोलियम जेली वापरा. तीव्र वेदना असल्यास दिवसातून चार वेळा बधिरता आणणारे मलम वापरा. पुरुषांच्या लिंगाच्या टोकाला वेदनादायक पॉक्स असल्यास देखील हे काम करते.

तुमचे मूल सर्वफोडे खपल्या धरून गेल्यावर शाळेत किंवा पाळणाघरात जाणे, जे साधारणतः पुरळ आल्यावर 6 व्या किंवा 7 व्या दिवसानंतर होते, जाऊशकते.

Dr. Jogya Bori

Dr. Jogya Bori

Infectious Disease
4 वर्षों का अनुभव

Dr. Lalit Shishara

Dr. Lalit Shishara

Infectious Disease
8 वर्षों का अनुभव

Dr. Alok Mishra

Dr. Alok Mishra

Infectious Disease
5 वर्षों का अनुभव

Dr. Amisha Mirchandani

Dr. Amisha Mirchandani

Infectious Disease
8 वर्षों का अनुभव

कांजण्या रोग की जांच का लैब टेस्ट करवाएं

VZV IgG - Varicella Zoster Virus IgG (Chicken Pox)

25% छूट + 5% कैशबैक

VZV IgM - Varicella Zoster Virus IgM (Chicken Pox)

25% छूट + 5% कैशबैक

कांजण्या रोग साठी औषधे

कांजण्या रोग के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Herpex खरीदें
ADEL 29 खरीदें
Mama Natura Chamodent खरीदें
SBL Prostonum Drops खरीदें
Valcet खरीदें
Valcivir खरीदें
Zimivir खरीदें
Valamac खरीदें
Valavir खरीदें
Valtoval खरीदें
SBL Cicaderma Ointment खरीदें
Clovir खरीदें
Opthovir खरीदें
Setuvir खरीदें
Toxinex खरीदें

References

 1. National institute of child health and human development [internet]. US Department of Health and Human Services; Chickenpox
 2. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Chickenpox (Varicella)
 3. Mohan Lal. Public Health Significance of Chickenpox in India. Department of Community Medicine, Government Medical College, Amritsar, Punjab, India
 4. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Chickenpox (Varicella). Harvard University, Cambridge, Massachusetts.
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Signs and Symptoms
 6. Healthdirect Australia. What causes chickenpox?. Australian government: Department of Health
 7. Department of Health and Senior Services. [Internet]. Department of Health and Social Security, Missouri. Varicella-Zoster Virus (Chickenpox and Shingles).
 8. Wu PY, Li YC, Wu HD. Risk factors for chickenpox incidence in Taiwan from a large-scale computerized database.. Int J Dermatol. 2007 Apr;46(4):362-6. PMID: 17442073
 9. American Academy of Pediatrics. Varicella Vaccine Update. Committee on Infectious Diseases Pediatrics Jan 2000, 105 (1) 136-141
 10. American Academy of Pediatrics. Prevention of Varicella: Recommendations for Use of Varicella Vaccines in Children, Including a Recommendation for a Routine 2-Dose Varicella Immunization Schedule. Committee on Infectious Diseases Pediatrics Jul 2007, 120 (1) 221-231
 11. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Prevention and Treatment
 12. Healthdirect Australia. Chickenpox diagnosis. Australian government: Department of Health
 13. Michigan Medicine: University of Michigan [internet]; Chickenpox: Controlling the Itch
 14. National Health Service [Internet]. UK; Chickenpox
 15. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Chickenpox Can Be Serious
 16. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Complications
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें