myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

सारांश

अती अल्प रक्तदाब किंवा कमी तणाव असणें एक सामान्य आरोग्य समस्या असली, तरी रक्तदाब कमी होणें (किंवा अल्पतणाव) सुद्धा तुमच्यासाठी आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. रक्तदाब म्हणजे हृदयाच्या संकुचन (सायस्टोल) आणि आकुचन (सायस्टोल) पावते या वेळी रक्तनलिकांच्या भिंतीवर रक्ताद्वारे पाडलेला दाब. रक्तदाबाच्या नोंदी 2 संख्यांनी दाखविल्या जातात, आणि त्याच्या सामान्य किंमती 120/80 mm/Hg अशा असतात.दाबाच्या नोंदी ९०/६० mm/Hg किंवा त्याखाली असल्यास, त्याला निम्न रक्तदाब समजले जाते. निम्न रक्तदाब काही लोकांसाठी सामान्य असून ते लक्षात येत नाही, तर इतरांमध्ये घेरी किंवा चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा डोके खूप हलके वाटण्यासारखी लक्षणे दिसू शकतात. साधारणपणें रक्तदाब पातळीमध्ये घसरण इजा, रक्तक्षय, तरळ पदार्थांमध्ये कमी किंवा काही औषधोपचारांमुळे असू शकते, निम्न रक्तदाबाची लक्षणे गंभीर असल्यास, मूल्यमापन आणि अंतर्भूत कारणावर उपचारासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा असतो. निम्न रक्तदाबाचे उपचार मुख्यत्त्वे मीठ व साखर यांचे द्रावण किंवा तरळ पदार्थ भरपूर मात्रेत घेणे असे असू शकते. निम्न रक्तदाब काही अंतर्भूत असलेल्या समस्येमुळे होत असल्यास, अशा त्या अंतर्भूत कारणावर उपचार केल्याने तो उपचार  सामान्यपणें रक्तदाबाला साधारण पातळीवर आणतो.

 1. रक्तदाब कमी (अल्पदाब) ची लक्षणे - Symptoms of Low Blood pressure in Marathi
 2. रक्तदाब कमी (अल्पदाब) चा उपचार - Treatment of Low Blood pressure in Marathi
 3. रक्तदाब कमी (अल्पदाब) काय आहे - What is Low Blood pressure in Marathi
 4. रक्तदाब कमी साठी औषधे

रक्तदाब कमी (अल्पदाब) ची लक्षणे - Symptoms of Low Blood pressure in Marathi

अधिकतर लोकांमध्ये, दाबामध्ये साधारण घसरण तात्कालिक असते आणि त्याची कोणतीच लक्षणे नसतात किंवा थोडीफार घेरी येऊ शकते. तथापी, रक्तदाब वारंवार कमी होणें किंवा गंभीर लक्षण म्हणजे आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. निम्न रक्तदाबाची चिन्हे किंवा लक्षणे पुढीलप्रमाणे:

 • घेरी (चक्कर) येंणें
 • डोके खूप हलके वाटणे.
 • नजर धुळसर होणे.
 • थकवा.
 • नीट उभा राहता न येणे.
 • अशक्तपणा.
 • थंड आणि शुष्क त्वचा
 • बेशुद्ध होणे

रक्तदाब लक्षणीय घसरल्यास, जिवाला धोका असतो आणि त्या परिस्थितीला धक्का म्हणतात. अशा वेळेस, चिन्हे आणि लक्षणे वेगळी आणि अधिक गहन असतात. ती पुढीलप्रमाणे आहेत:

 • भ्रम (वयस्कर व्यक्तींमध्ये अधिक गहन).
 • श्वसन जलद आणि ठिसूळ होते. (अधिक वाचा – श्वास छोटा होणे)
 • नाडी कमजोर व जलद असते
 • कातडी पिवळी, थंड आणि शुष्क पडते.

धक्का सामान्यपणें आपत्कालीन परिस्थिती असून त्याला योग्य उपचाराची गरज असते.

रक्तदाब कमी (अल्पदाब) चा उपचार - Treatment of Low Blood pressure in Marathi

सामान्यपणे, निम्न रक्तदाब लक्षात येत नाही किंवा मोठी होतील अशीलक्षणें दिसत नाहीत किंवा सौम्य लक्षणे दिसतात. म्हणून त्याला उपचार करणें लागत नाही. तथापी, लक्षणे निरंतर दिसल्यास आणि काही अंतर्निहित कारण असल्यास, त्या अंतर्निहित कारणाला जाणून घेणें आणि त्याचे उपचार केल्याने समस्येचा समाधान होतो. निम्न रक्तदाब एखाद्या विपरीत औषधोपचारामुळे होत असल्यास, औषध बदलल्याने किंवा त्याची मात्रा बदलल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते.

अल्पतणावाचे कारण अस्पष्ट असल्यास, उपचाराचे उद्देश रुग्णाचे रक्तदाब उंचावणें आणि सांभाळणें आणि साहजिकच चिन्हे व लक्षणे कमी करणे असे असते. याकरिता सामान्य देऊ घातलेले निर्देश याप्रमाणें:

 • अधिक मीठ घेणें
  याने रक्तातील तरळ पदार्थाची पातळी वाढते आणि रुग्णाच्या रक्ताचा दाब उंचावतो.
 • अधिक तरळ पदार्थ घेणें
  मिठाप्रमाणें यानेसुद्धा रुग्णाच्या रक्तातील तरळ पदार्थाची पातळी वाढते आणि रुग्णाच्या रक्ताचा दाब उंचावतो.
 • तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेणें
  तुमचे डॉक्टर विशिष्ट औषधे, उदा. फ्लूड्रोकोर्टिसोन किंवा माइडोड्रीन लिहू शकतात, ज्याने रुग्णाच्या रक्ताचा दाब वाढण्यास मदत होते.याचा वापर साधारणपणें निरंतर ऑर्थोस्टेटिक अल्पतणावामध्ये होतो.
 • कंप्रेशन किंवा स्टॉकिंग घालणें
  कंप्रेशन किंवा स्टॉकिंग घातल्याने तुमच्या पिंजराला संकुचित ठेवतात. कंप्रेशन आणि स्टॉकिंग  रक्ताभोवती जमतात, आणि या कंप्रेशनमुळे रक्त तिथे थांबत नाही. शरिरात रक्त संचार करत राहतो आणि रुग्णाच्या रक्ताचा दाब उंचावतो.

रक्तदाब कमी (अल्पदाब) काय आहे - What is Low Blood pressure in Marathi

रक्तदाब म्हणजे रक्तनलिकांच्या भिंतीवर रक्ताद्वारे पाडलेला दाब. दाब हृदयगतीचे ठोके पडण्याच्या वेळी रक्ताने पाडलेल्या  बळामुळे असते. रक्त हृदयाच्या आत जातेवेळी अधिक (सिस्टॉलिक प्रेशर) आणि हृदयाच्या निःश्वासाच्या वेळी सामान्यतः कमी असते (डायस्टॉलिक प्रेशर). रक्तदाबाचे माप स्फायग्मोमॅनोमीटर नावाच्या एक उपकरणाद्वारे होते. एका वयस्काचे सामान्य रक्तदाब 120 (सायस्टोलिक)/80 (डायस्टोलिक) mm/Hg असते.

निम्न रक्तदाब म्हणजे अल्पतणाव. ती रक्तदाब ९०/६० mm/Hg किंवा कमी, एवढे घसरेल अशी परिस्थिती असते. काही लोकांना घेरी (चक्कर) किंवा बेशुद्धी येते, पण ते गंभीर असल्यास, रुग्णाच्या जिवाला घातक असू शकते.

निम्न रक्तदाब निर्जलीकरण यापासून गंभीर शस्त्रक्रियासंबंधी किंवा वैद्यकीय असलेल्या अनेकविध परिस्थितींमुळे असू शकते. याचे उपचार काही अंतर्भूत कारण असल्यास, त्यावर केंद्रित असते. म्हणून, अल्पतणावाचे कारण शोधून काढणें त्याच्या यशस्वी उपचाराचा पहिला पाऊल असतो.मग, निम्न रक्तदाब कशामुळे होतो? आम्ही त्याला कसे सामोरे जाऊ शकतो? निम्न रक्तदाबाबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे वाचत रहा.

रक्तदाब कमी की जांच का लैब टेस्ट करवाएं

KFT ( Kidney Function Test )

25% छूट + 5% कैशबैक

Thyroid Function Test ( T3 - T4 - TSH )

25% छूट + 5% कैशबैक

CBC (Complete Blood Count)

25% छूट + 5% कैशबैक

रक्तदाब कमी साठी औषधे

रक्तदाब कमी के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Kolq खरीदें
Ascoril D खरीदें
Sinarest Levo खरीदें
Low Dex खरीदें
Lpc खरीदें
Ebast Dc खरीदें
Vilcold Z खरीदें
Allercet Cold खरीदें
Flucozy खरीदें
Levo Setride खरीदें
Torex Ap खरीदें
Lezyncet Cold खरीदें
Quick Action (Kopran Ltd) खरीदें
Burex Plus खरीदें
Okacet L Plus खरीदें
Rekof Cc खरीदें

References

 1. National Health Service [internet]. UK; Low blood pressure (hypotension)
 2. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; https://www.emedicinehealth.com/low_blood_pressure/article_em.htm#exams_and_tests_for_low_blood_pressure
 3. Kim A.W., Maxhimer J.B. (2008) Hypotension in the Postoperative Patient. In: Myers J.A., Millikan K.W., Saclarides T.J. (eds) Common Surgical Diseases. Springer, New York, NY
 4. American Heart Association, American Stroke Association [internet]: Texas, USA AHA: Low Blood Pressure - When Blood Pressure Is Too Low
 5. Munir Zaqqa, Ali Massumi. Neurally Mediated Syncope. Tex Heart Inst J. 2000; 27(3): 268–272. PMID: 11093411
 6. MSD mannual consumer version [internet].Postprandial Hypotension. Merck Sharp & Dohme Corp. Merck & Co., Inc., Kenilworth, NJ, USA
 7. The Merck Manual of Diagnosis and Therapy [internet]. US; Orthostatic Hypotension
 8. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Low blood pressure
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें