myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) काय आहे?

अटेंशन डेफिसिट हाइपरॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी /अतिचंचलता अवस्था) हा मेंदूच्या कार्याचा एक सामान्य विकासात्मक विकार आहे, ज्याचे निदान साधारणतः बालपणात होते पण ते प्रौढावस्थेत देखील आढळू शकते. हा मेंदूचा अनुवांशिक आणि रासायनिक आणि संरचनात्मक बदल-संबंधित विकार आहे. एडीएचडी असलेले मुले सामान्यत: अतिक्रियाशील असतात, त्यांना लक्ष देणे कठिण जाते आणि परिणामांबद्दल विचार न करता वागतात.

याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

मुख्यतः, एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) असलेल्या मुलांमध्ये मुख्य लक्षणे म्हणून दुर्लक्ष, आवेग आणि हायपरक्टिव्हिटी दिसून येते. यापैकी एखादे किंवा तीनही लक्षण एकत्रितपणे मुलाच्या वर्तनात दिसून येतात. सर्वात सामान्य लक्षण हे हायपरक्टिव्हिटी आहे. एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) असलेल्या लोकांमध्ये, ही वागणूक अधिक गंभीर असते आणि ते बऱ्याचदा हायपरक्टिव्ह होऊ शकतात आणि शाळा किंवा कामात सामाजिक कार्ये करतांना यांच्यावर दडपण येऊ शकते. तीन प्रमुख वैशिष्ट्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

 • निष्क्रियता 
  लक्ष केंद्रित करण्यात अडचणी, विसरभोळेपपणा किंवा वस्तू अस्थाव्यस्त ठेवणे, काम आयोजित करण्यात किंवा पूर्ण करण्यात अडचण,आदेशांचे पालन आणि चर्चा करण्यात अडचणी,सहजगत्या विचलित होणे आणि दैनंदिन कामाची माहिती लक्षात ठेवण्यात अपयश.
 • आवेग आणि अतिसक्रियता/ हायपरॲक्टिव्हिटी 
  दीर्घकाळासाठी बसणे अशक्य होते, वरचेवर अपघात होणे, वारंवार विचलित करणारे वर्तन, सतत बडबड करणे; इतरांना त्रास देणे, इतरांकडून वस्तू  बळकावण्याची प्रवृत्ती, अनुचित वेळी बोलणे, बोलण्यापूर्वी इतरांचे न ऐकणे किंवा इतरांना न बोलू देणे.
 • संयुक्त रुप
   वरील दोन्ही प्रकारचे लक्षणं समान प्रमाणात दिसतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

अचूक कारण अज्ञात आहे, परंतु एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) होण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक अंतर्भूत तंत्रांचा अभ्यास सातत्याने करत आहेत. सामान्य जोखीम कारणांमध्ये हे समाविष्ट होते:

 • अनुवांशिक
  एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) च्या संभावनांमध्ये जेनेटिक्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संशोधकांनी जेनेटिक उत्परिवर्तन संभाव्य जोखिमेच्या कारणांपैकी एक म्हणून नमूद केले आहे. एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) आनुवांशिक देखील असू शकते. 
 • मेंदूची इजा गर्भाशयात किंवा नंतरच्या आयुष्यात मेंदूला इजा झाल्याने त्याचा रचनेत आणि नैसर्गिक कार्यात झालेल्या कोणत्याही जखमेमुळे एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) होऊ शकते.
 • औषधे एखाद्या बाळाच्या आईने गरोदरपणात मद्यपान, तंबाखू किंवा कोकेनचा वापर केला असेल तर तिच्या बाळ  एडीएचडी(अतिचंचलता अवस्था) होऊ शकते.
 • शिसे गरोदरपणाण पर्यावरणीय प्रदूषणाशी, जसे की लीड/शिसे, थेट संपर्क देखील एक कारक घटक आहे.
 • जन्मजात दोष ज्या मुलांचा जन्म अकाली झाला आहे किंवा ज्यांचे जन्माच्या वेळी वजन खूप कमी असते त्यांना हा धोका असतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

एडीएचडी (अतिचंचलता अवस्था)च्या निदानासाठी कोणतीही विशिष्ट चाचणी नाही आहे. बालरोगतज्ञ किंवा मनोचिकित्सक मुलाचे तपशीलवार मूल्यांकन केल्यानंतर आणि पालक आणि शिक्षकांकडून वैद्यकीय आणि वर्तणूक इतिहास काढल्यानंतरच एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) चे निदान करू शकतात.

जेव्हा तुम्ही डॉक्टरांना भेटाला तेव्हा ते तुमच्या मुलाच्या लक्षणांबद्दल विचारतील: ही लक्षणे केव्हापासून सुरू झाली, ते साधारणतः (घर किंवा शाळेत) कुठे होतात, यामुळे मुलाचे दैनंदिन आणि सामाजिक आयुष्य प्रभावित होते का, कुटुंबात एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) चा कौटुंबिक इतिहास आहे का, कुटुंबात मृत्यू किंवा घटस्फोट झाला आहे का, मुलाचा विकासात्मक इतिहास काय आहे, पूर्वीचे वर्तन आणि आघात किंवा कोणत्याही आजारांचा वैद्यकीय इतिहास काय आहे. डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) चे निदान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त साधने, स्केल आणि इतर निकषांचा वापर करतात.

एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) लक्षणे अनेक प्रकारे हाताळली जाऊ शकतात. डॉक्टर त्यांच्या उपचारांसोबत अनेक औषधं आणि थेरपी वापरतात. औषधे मेंदू-संबंधित कार्ये व्यवस्थापित करतात, तर थेरपी विचार आणि वर्तन हाताळते.

स्टिम्युलंट्सचा वापर सामान्यत: औषधे म्हणून केला जातो, ज्यामुळे हायपरक्टिव्हिटी आणि आवेग कमी होते आणि मुलाला लक्ष केंद्रित होण्यास मदत होते, काम करणे आणि शिकणे शक्य होते. मनोचिकित्सा ज्यामध्ये वर्तनोपचार आणि संज्ञानात्मक वर्तनाची थेरेपी यांचा समावेश आहे. या पद्धती सामान्यपणे डॉक्टरांद्वारे वापरल्या जातात. मुलासाठी आणि कौटुंबिक सदस्यांसाठी काउन्सिलिंग देखील केली जाते. जोडप्यांना पालकत्वाच्या दृष्टिकोनातून देखील प्रशिक्षित केले जाते आणि तणाव व्यवस्थापन कार्यक्रम राबविले जातात. पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असलेल्या मुलांना एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) सारखे लक्षणं असतात परंतु त्यांना वेगळ्या उपचारांची आवश्यकता असते. सर्वात उपयुक्त उपचार पूर्णपणे मुलांवर आणि कुटुंबावर अवलंबून असतो. चांगला उपचार होण्यासाठी काळजीपूर्वक निरीक्षण, फॉलो-अप आणि आवश्यकता भासल्यास थेरपी आणि औषधे यांच्यात बदल करावे लागतात.

 1. एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) साठी औषधे
 2. एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) चे डॉक्टर
Dr. Anil Kumar

Dr. Anil Kumar

साइकेट्री

Dr. Ajay Kumar Vashishtha

Dr. Ajay Kumar Vashishtha

साइकेट्री

Dr. Amar Golder

Dr. Amar Golder

साइकेट्री

एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) साठी औषधे

एडीएचडी (अतिचंचलता अवस्था) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Atokem खरीदें
Attentrol खरीदें
Attera खरीदें
Axepta खरीदें
Starkid खरीदें
Tomoxetin खरीदें
Arkamin खरीदें
Catapres खरीदें
Clodict खरीदें
Cloneon खरीदें
Addwize Od खरीदें

References

 1. National institute of mental health. Attention-Deficit/Hyperactivity Disorder. U.S. Department of Health and Human Services
 2. National Health Service [Internet]. UK; Attention deficit hyperactivity disorder (ADHD)
 3. Centre for Health Informatics. [Internet]. National Institute of Health and Family Welfare What is ADHD?
 4. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Attention deficit hyperactivity disorder (ADHD)
 5. Mental health .Attention deficit hyperactivity disorder (ADHD). U.S. Department of Health & Human Services. [internet].
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें